एक्स्प्लोर

Parineeti Chopra : "राजकीय नेत्याशी लग्न..."; खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान परिणीती चोप्राचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Parineeti Chopra Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) सध्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान परिणीतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 'जबरिया जोडी'च्या प्रमोशनदरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती म्हणतेय,"मी कधीच कोणत्या राजकीय नेत्यासोबत लग्न करणार नाही". 

परिणीतीचा व्हायरल व्हिडीओ काय आहे? (Parineeti Chopra Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये एका रॅपिड फायर राउंडमध्ये परिणीतीला राजकारण्याशी लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला जात आहे. यावर ती म्हणाली,"मला कोणत्याही राजकीय व्यक्तीसोबत लग्न करायचं नाही आहे. माझ्यासमोर अनेक चांगले पर्याय आहेत. त्यामुळे मी राजकारण्याशी कधीच लग्न करणार नाही". होणारा नवरा कसा हवा यावर बोलताना परिणीती म्हणाली,"सकारात्मक विचार करणारा आणि माझा आदर करेल असा नवरा मला हवा आहे".

अफेअरच्या चर्चेदरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावरील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे परिणीतीला राजकारण्याशी लग्न करायचं नाही तर दुसरीकडे मात्र ती अनेकदा राघव चढ्ढा यांच्यासोबत स्पॉट झाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गायक हार्डी संधूने एका मुलाखतीत परिणीती आणि राघव यांच्या लग्नासंदर्भात भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की, परिणीती आणि राघव लवकरच लग्न करणार आहेत. तसेच लग्न ठरल्यामुळे मी परिणीतीचं अभिनंदनदेखील केलं आहे". तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनीदेखील ट्वीट करत परिणीती आणि राघवचं अभिनंदन केलं होतं. 

राघव चढ्ढा परिणीतीला पहिल्यांदा कुठे भेटले? (Parineeti Chopra Raghav Chadha Love Story)

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.

संबंधित बातम्या

Parineeti Chopra and Raghav Chadha : अफेअरच्या चर्चेदरम्यान आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा मुंबई विमानतळावर दिसले एकत्र; पाहा व्हिडीओ...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
Embed widget