चित्रपटांमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री परिणीती आता नोकरीच्या शोधात; सोशल मीडियावर म्हणाली, 'प्लीज मला एअरपोर्टवर नोकरी मिळवून द्या'
Bollywood News : अभिनेत्री परिणिती चोप्राला बॉलिवूडमध्ये काही खास स्टारडम मिळवता आलेलं नाही, त्यानंतर आता ती नोकरीच्या शोधात आहे.
Parineeti Chopra Search For Job At Airport : बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अनेक लोक येतात. मुंबईत लाखो लोक स्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येतात. पण, प्रत्येकालाच यामध्ये यश मिळतं असं नाही. काही कलाकार मेहनतीच्या बळावर नाव कमावतात, तर काहींचं नशीब मात्र खास साथ देत नाही. यामुळे अनेक लोक हताश होऊन परततात. फिल्मी बॅकग्राऊंड असूनही अभिनेत्री परिणिती चोप्राला बॉलिवूडमध्ये काही खास स्टारडम मिळवता आलेलं नाही, त्यानंतर आता ती नोकरीच्या शोधात आहे.
चित्रपटांमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री नोकरीच्या शोधात
अभिनेत्री परिणिती चोप्रा हिची चुलत बहीण प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटांमध्ये खूप नाव कमावलं आहे, परिणीतीला तसं स्टारडम मिळवता आलं नाही. परिणीतीला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांची ऑफर आली, पण यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकले नाहीत. परिणीती चोप्लाने तिचा कॉलेजमधील मित्र आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न केलं. यानंतर ती राघवसोबत जगभर फिरत आहे.
परिणीती चोप्रा नोकरीच्या शोधात
चित्रपटांमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री परिणीती चोप्रा आता नोकरीच्या शोधात आहे. परिणीतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ती म्हणाला की, '...कोणीतरी कृपया मला विमानतळावर नोकरी मिळवून द्या.'
परिणीतीला विमानतळावर काम करायची इच्छा
परिणीती नोकरी करण्याची इच्छा चाहत्यांसोबत मजेशीर पद्धतीने शेअर केली आहे. परिणीती तिचा पती राघव चढ्ढासोबत जगभर फिरण्याचा आनंद घेत आहे, यामुळे ती सतत फ्लाइटने प्रवास करत असते आणि म्हणूनच तिने गंमतीशीरपणे चाहत्यांना म्हटलं की, तिला कोणीतरी विमानतळावर नोकरी मिळवून द्यावी.
परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले, 'गेल्या 12 दिवसांच्या फ्लाइट्स - बॉम्बे, अबू धाबी, वॉशिंग्टन, डीसी, व्हर्जिनिया बीच, डीसी, अबू धाबी, दुबई, इस्तंबूल, बोडरम, इस्तंबूल, अबू धाबी, दुबई, बॉम्बे, दिल्ली कोणत्याही विमानतळावर मला नोकरी मिळवून द्या.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :