Salman Khan : सलमान खानशी पंगा! निर्मात्याची गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला चित्रपटाची ऑफर; गृहमंत्रालयालाही विनंती
KKR Offer For Lawrence Bishnoi : फिल्ममेकर कमाल खानने सलमान खानचा शत्रू लॉरेन्स बिश्नोईला थेट चित्रपटाची ऑफर दिली आहे.
KKR Offer Film To Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान (Kamal Khan) उर्फ केआरके (KRK) यानं आता अभिनेता सलमान खानशी पंगा घेतला आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते सलमान खानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामागचं कारण सलमान खानसोबत त्याचे चांगले संबंध असल्याचं सांगत लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खानची सुरक्षा या पार्श्वभूमीवर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
निर्मात्याचा सलमान खानशी पंगा
एकीकडे पोलिस कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या हात धुवून मागे लागली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. केंद्रीय यंत्रणा या प्रकरणात अटकेत असणाऱ्या आरोपींची चौकशी करत गँगस्टरच्या शोधात आहेत. यानंतर आता लॉरेन्स बिश्नोई बॉलिवूडच्या नजरेत आला आहे. एकीकडे सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने लॉरेन्स बिश्नोईसोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आता एका बॉलिवूड निर्मात्याने सलमान खानचा शत्रू लॉरेन्स बिश्नोईलाच थेट ऑफर दिली आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला निर्मात्याची खास ऑफर
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमल आर. खान याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अतिक्रियाशील झाला आहे. जो प्रोफेशनली 'केआरके' म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या 'देशद्रोही' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बिश्नोईला मुख्य भूमिकेत कास्ट करण्याची इच्छा व्यक्त केली.
लॉरेन्स बिश्नोईला देशद्रोही 2 चित्रपटाची ऑफर
कमाल खानने X वर पोस्ट करत लिहिलंय, "मी माझा देशद्रोही 2 चित्रपट लॉरेन्स बिश्नोईला ऑफर करतो, कारण तो एक आदर्श हिरोसारखा दिसतो. जेव्हा तो चित्रपटात प्रत्यक्ष ॲक्शन करेल, तेव्हा तो चांगला दिसेल. त्यामुळे मी गृहमंत्र कार्यालयालाही विनंती करतो की, त्याला काम करण्याची परवानगी द्यावी."
I offer my film #Deshdrohi2 to #LawrenceBishnoi because he looks like a perfect hero. He will look good, when he will do Real action in the film. So I request to @HMOIndia to allow him to work.
— KRK (@kamaalrkhan) October 17, 2024
And I will request to Budhaoo to play villain in the same film. pic.twitter.com/Izzx0YyNN3
महत्त्वाच्या इतर बातम्या :