एक्स्प्लोर

OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी

OTT Releases This Weekend : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो असे वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या टीमसह आता ओटीटीवर झळकणार आहे.

OTT Web Series Release : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Releases This Weekend) प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी असणार आहे. कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो असे वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या टीमसह आता ओटीटीवर झळकणार आहे.

पटना शुक्ला (Patana Shukla)

पटना शुक्ला हा चित्रपट  हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री रविना टंडन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ही शिक्षण क्षेत्रातील एका घोटाळ्याशी संबंधित आहे. चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशल यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. रविना टंडन ही तन्वी शुक्ला या महिला वकिलाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. 

द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show)

कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या टीमसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमची ओटीटीवर धमाकेदार एन्ट्री होईल असा विश्वास चाहत्यांना वाटत आहे. सुनील ग्रोव्हरही या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा कपिलसोबत काम करणार आहे. 30 मार्च पासून हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर शनिवारी प्रत्येक शनिवारी कॉमेडी शोचा नवा एपिसोड रिलीज होणार आहे. 

ऑपरेशन व्हेलेंटाईन (Operation Valentine)

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइक आधारीत हा चित्रपट आहे. हा एक थ्रिलरपट आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यावर चित्रपटाची कथा आधारीत आहे. अभिनेता वरुण तेज, अभिनेत्री मानुषी चिल्लर यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. 

इन्स्पेक्टर ऋषी (तमिळ)

'इन्स्पेक्टर ऋषी'ही एक तमिळ हॉरर वेब सीरिज आहे. एका छोट्या गावातील पार्श्वभूमीवर या वेब सीरिजची गोष्ट बेतली आहे. या गावात सीरियल किलिंग होत असल्याचे दहशतीचे वातावरण आहे. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तपासासाठी गावात दाखल होते. त्यात अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो.  'इन्स्पेक्टर ऋषी' या वेब सीरिजमध्ये नवीन चंद्र, सुनैया येला, श्रीकृष्ण दयाल आणि कन्ना रवी यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही वेब सीरिज 29 मार्च पासून प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. 

द ब्युटीफुल गेम  (The Beautiful Game)

ही वेब सीरिज 29 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज पाहता येणार आहे.  

प्रेमालू (Premalu)

तुम्ही मल्याळम चित्रपटांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी रोमँटिक कॉमेडी चित्रपट डिस्ने हॉट स्टारवर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'प्रेमालू' हा 2024 मधील मल्याळम  रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. गिरीश ए.डी. यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात नसलेन के. गफूर आणि ममिथा बैजू मुख्य भूमिकेत आहेत.  संगीत प्रताप, श्याम मोहन एम, मीनाक्षी रवींद्रन, अखिला भार्गवन, अल्थाफ सलीम आणि मॅथ्यू थॉमस आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget