एक्स्प्लोर

OTT Release This Week : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी! 'हे' चित्रपट अन् वेबसीरिज होणार रिलीज

OTT Release This Week : एप्रिल महिन्याच्या 'या' आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात विविध चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यातही ओटीटीवर कॉमेडी (Comedy), अॅक्शन (Action), रोमान्स (Romance) अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची आणि वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल (April) महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक 2024 ची (LOksabha Election 2024) धामधूम आहे. शाळकरी मुलांच्या उन्हाळी उट्ट्या सुरू झाल्या आहेत. अशातच आता घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

फर्रे (Farrey)
कुठे पाहता येईल? झी 5
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल 2024

'फर्रे' हा चित्रपट एक अनाथ प्रतिभाशाली मुलगी नियतीवर आधारित आहे. एका श्रीमंत शाळेत तिला प्रवेश मिळतो. या शाळेतील श्रीमंत मुलांसमोर ती श्रीमंत असण्याचं नाटक करते आणि एका रॅकेटमध्ये अडकते. 'फर्रे' या चित्रपटात अलीजेह अग्निहोत्री आणि जीन शॉ प्रमुख भूमिकेत आहेत. तर प्रसन्ना बिष्ट, रोनित रॉय, साहित मेहता, जूही बब्बर, अरबाज खान आणि शिल्पा शुक्ला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 5 एप्रिलला हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ये मेरी फॅमिली सीझन 3 (Yeh Meri Family Season 3)
कुठे पाहता येणार? अॅमेझॉन मिनी टीव्ही
कधी रिलीज होणार? 4 एप्रिल 2024

'ये मेरी फॅमिली सीझन 3' या वेबसीरिजमध्ये 90 च्या दशकातील गोष्ट दाखवण्यात आली आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये विशेष बंसल, मोना सिंह, आकाश खुराना, अहान निरबान, रुही खान आणि प्रसाद रेड्डी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अॅमेझॉन मिनी टीव्हीवर चार एप्रिलला ही सीरिज रिलीज होणार आहे.

पॅरासाईट द ग्रे (Parasyte : The Grey)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल 2024

'पॅरासाईट द ग्रे' ही सीरिज 'पॅरासाईट' या कादंबरीवर आधारित आहे. मंगा हितोशी या पात्राभोवती फिरणारी या सीरिजची गोष्ट आहे. मंगा हितोशी या पात्राभोवती फिरणारी ही सीरिज आहे. येत्या 5 एप्रिलला नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होणार आहे. 

रिप्ले (Ripley)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 4 एप्रिल 2024

एका श्रीमंत माणसाची गोष्ट 'रिप्ले' या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 'द  टैलेंटेड मिस्टर रिप्ले'वर आधारित ही सीरिज आहे. 'रिप्ले' ही सीरिज 4 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

स्कूप (Scoop)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल 2024

'स्कूप' या चित्रपटात गिलियन एंडरसन, रुफस सेवेल, बिली पाइपर आणि कीली हॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 5 एप्रिल 2024 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

लूट सीझन 2 (Loot 2)
कुठे पाहता येईल? एप्पल टीव्ही प्लस
कधी रिलीज होणार? 3 एप्रिल 2024

'लूट सीझन 2' मध्ये मौली नौवाकला केंद्रीत करण्यात आले आहेत. मौलीचा लग्नाच्या 20 वर्षांनंतर घटस्फोट होतो त्यानंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा एक सामाजिक संस्था स्थापन करुन ती जगण्याचा संघर्ष करते. या सीरिजमध्ये माया रुडोल्फ, माइकेल जे रोड्रिग्ज, जोएल किम बूस्टर, रॉन फंचेस हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 3 एप्रिल 2024 रोजी एप्पल टीव्ही प्लसवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Upcoming OTT Release of April : 'या' महिन्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेबसीरिज अन् चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget