OTT Release This Week : क्राईम, थ्रिलर अन् हॉरर.. ओटीटीवर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज आणि सिनेमा
OTT Web Series : फेब्रुवारी महिन्याचा हा आठवडा खूपच धमाकेदार असणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) या आठवड्यातही एका पेक्षा एक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. थरारा, नाट्य, हॉरर, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत. एकंदरीतच हा आठवडा खूपच धमाकेदार असणार आहे. 19 ते 25 फेब्रुवारीदरम्यान रिलीज होणाऱ्या वेबसीरिज (Web Series) आणि सिनेमांबद्दल जाणून घ्या...
अवतार द लास्ट एयरबेंडर (Avatar the Last Airbender)
कधी रिलीज होणार? 22 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
'अवतार द लास्ट एयरबेंडर' ही सीरिज 22 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही आठ भागांची सीरिज आहे. अमेरिकन एनिमेटेड फँटसी अॅडव्हेंचर असलेली ही सीरिज आहे.
अपार्टमेंट 404 (Apartment 404)
कधी रिलीज होणार? 24 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ
'अपार्टमेंट 404' हा कोरियन थ्रिलर शो आहे. 24 फेब्रुवारी 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो रिलीज होणार आहे. अनेक असाधारण घटना घडत असलेल्या या शोमध्ये पाहायला मिळत आहे.
पोचर (Poacher)
कधी रिलीज होणार? 23 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ
'पोचर' ही हिंदी वेबसीरिज प्रेक्षकांना 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आलियासह निमिषा सजयन, रोशन मैथ्यू आणि दिब्येंदु भट्टाचार्च या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
द इंद्राणी मुखर्जी स्टोरी - बरीड ट्रुथ (The Indrani Mukerjea Story: Buried Truth)
कधी रिलीज होणार? 23 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी - बरीड ट्रुथ' ही माहितीपट असणारी सीरिज आहे. ही सीरिज 23 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये शीना बोरा मर्डर केसवर भाष्य करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सच्या या सीरिजची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. या सीरिजचं जोरदार प्रमोशनदेखील करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या