Oscar Awards 2022 : 'ऑस्कर नामांकनाच्या यादीत 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन, 'जय भीम' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाद
Oscar Awards 2022 : 'ऑस्कर नामांकन 2022' मंगळवारी जाहीर करण्यात आले आहेत.
Oscar Nominations 2022 : कोरोनाकाळात अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तर काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
अशातच आज 94 व्या ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन जाहीर झाले आहेत. यात 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.
नेटफ्लिक्सची निर्मिती असलेल्या 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक म्हणजेच 12 नामांकनं मिळाली आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन जिनी कॅम्पियनने केले आहे. त्या खालोखाल वॉर्नर ब्रदर्सच्या 'ड्यून' या सिनेमाला 10 नामांकनं मिळाली आहेत. 'नो टाईम टू डाय' या बॉण्डपटाला सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी एकमात्र नामांकन मिळालं आहे. तर याच कॅटॅगरीत 'नो वे टू होम' या स्पायडरपटाचाही समावेश आहे.
भारतीय सिनेरसिक 'जय भीम' या सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळावे, अशी प्रतीक्षा करत होते. पण नामांकनाच्या शर्यतीत हा सिनेमा टिकू शकलेला नाही. 94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 27 जानेवारीपासून मतदान सुरू होते. ते 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू होते.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी नामांकन
ड्युन (Dune), नाईटमेअर अॅली (Nightmare Alley), 'द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ' (The Tragedy of Macbeth),वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
द हॅंड ऑफ गॉड (The Hand of God), लुनाना: अ याक इन द क्लासरूम (Lunana: A Yak in the Classroom), द व्हर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड (The Worst Person In the World), ड्राईव्ह माय कार (Drive My Car), फ्ली (Flee)
सर्वोत्कृष्ट सिनेमा
बेलफास्ट (Belfast), कोडा (Coda), डोन्ट लूक अप (Don't Look Up),ड्युन (Dune), ड्राईव्ह माय कार (Drive My Car), किंग रिचर्ड (King Richard), लिकोरिस पिझ्झा (Licorice Pizza), नाईटमेअर अॅली (Nightmare Alley), द पॉवर ऑफ द डॉग (The Power of The Dog), वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
संबंधित बातम्या
Bestseller Series Trailer : 'ताहिर वजीर' देव आहे की राक्षस? 'बेस्टसेलर' सीरिजचा 'हा' ट्रेलर पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Election 2022: निवडणूकीच्या तोंडावर अभिनेत्री रिमी सेन काँग्रेसमध्ये, तर माही गिलचा भाजपमध्ये प्रवेश
Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर हंसल मेहता यांची नवी सीरिज; पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित असणार कथानक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha