एक्स्प्लोर

Oppenheimer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'ओपनहायमर'चा धमाका; दोन दिवसांत केली 30 कोटींपेक्षा अधिक कमाई

Oppenheimer Movie : 'ओपनहायमर' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर' (Oppenheimer) हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा एक बायोपिक आहे. हॉलिवूडचा (Hollywood) लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने (Christopher Nolan) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ख्रिस्तोफरचे चाहते काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'ओपनहायमर' हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने चाहते सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहत आहेत. 

'ओपनहायमर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Oppenheimer Box Office Collection)

'ओपनहायमर' हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'ओपनहाइमर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 14.50 कोटींची (Opeenheimer Opning Day Collection) दणदणीत कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 17 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीच्या कमाईत आणखी वाढ झालेली आहे. दोन दिवसांत या सिनेमाने 31.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'ओपनहायमर' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये (IMDB Rating) 10 पैकी 9 रेटिंग मिळाले आहे. सिनेमाला 61.7% लोकांनी 10 रेटिंग दिले आहे. तर 18.7% लोकांनी 9 आणि 10.5% मंडळींनी 1.9% लोकांनी 1 रेटिंग दिलं आहे.

'ओपनहायमर'बद्दल जाणून घ्या...

'ओपनहायमर' हा सिनेमा जे. रॉबर्ट ओपेनहायमर  (J. Robert Oppenheimer) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. 'फादर ऑफ द अॅटॉमिक बॉम्ब' म्हणूनही ते ओळखले जातात. अणुबॉंबचे जनक असलेल्या जे. रॉपर्ट ओपेनहायमर यांचा प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे. हा सिनेमा ओपेनहायमर यांची पहिली अणुचाचणी 'ट्रिनिटी'बद्दल भाष्य करणारा आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

'ओपनहायमर' या सिनेमाच्या तिकिटाची किंमत 2000 पेक्षा अधिक आहे. पण तरीही ख्रिस्तोफर नोलनच्या नावामुळे हा सिनेमा हाऊसफुल्ल गर्दी खेचत आहे. 'ओपनहायमर' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांतच भारतीय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे.  

हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने (Cillian Murphy) या सिनेमात जे रॉबर्ट यांची भूमिका साकारली आहे. टॉम क्रूझच्या 'मिशन : इम्पॉसिबल 7' या सिनेमालाही 'ओपनहायमर'ने मागे टाकलं आहे. जगभरात या सिनेमाने दोन दिवसांत 250 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. कलाकारांचा अभिनय, कथानक, पटकथा आणि ख्रिस्तोफर नोलनचं कमाल दिग्दर्शन या सर्वच गोष्टींचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आता वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या

Oppenheimer Review : ख्रिस्टोफर नोलानचा मास्टरपीस 'ओपनहायमर'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget