एक्स्प्लोर
रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर!
दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमाची घोषणा झाली असली तरी सुरुवातीला चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं.
मुंबई : 'सैराट' चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली रिंकू राजगुरु सध्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'रिंगण'फेम मकरंद मानेच्या सिनेमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. आता या सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
या चित्रपटाचं नाव आहे कागर. रिंकूच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि फोटो नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमाची घोषणा झाली असली तरी सुरुवातीला चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं.
या चित्रपटात रिंकूसह इतर कलाकार कोण आहेत, हे लवकरच जाहीर होईल. 'उदाहरणार्थ निर्मित'चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
'रिंगण'फेम मकरंद मानेने त्याच्या नव्या सिनेमासाठी रिंकूची निवड केली आहे. विशेष म्हणजे मकरंद आणि रिंकू या दोघांनाही एकाच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
'रिंगण' सिनेमातून मकरंदमधला संवेदनशील दिग्दर्शक दिसला तर 'सैराट'मधून रिंकूमधली अभिनेत्री समोर आली. त्यामुळे आता या दोघांची एकत्रित कलाकृती कशी असेल याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
दरम्यान, चित्रपटाचं नाव वाचून/पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी नक्कीच कुतूहल निर्माण होईल, याची खात्री आहे. तसंच या चित्रपटातून प्रेक्षकांना बरीच सरप्राईज मिळणार आहेत,' असं दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले.
संबंधित बातम्या
रिंकू राजगुरुच्या नव्या सिनेमाची घोषणा!
रिंकू राजगुरु सध्या काय करते?
मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये यंदा सैराटची धूम
व्हायरल सत्य : धबधब्याजवळ नाचताना रिंकू जोरदार पडली?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement