Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; देसाईंनी काल रात्री रेकॉर्ड केल्या ऑडिओ क्लिप्स
नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या होत्या.
Nitin Desai : कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण आलं. नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल रात्री दिल्लीवरुन आल्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यांनी काही वॉइज नोट्स रेकॉर्ड केले आहेत. या वॉइज नोट्समध्ये जवळपास चार बिझनेसमनचा उल्लेख केला आहे.
काल रात्री 12 वाजता नितीन देसाई हे दिल्लीवरुन मुंबई विमानतळावर पोहोचले. तिथून गाडी घेऊन ते कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये रात्री 2.30 वाजता पोहोचले. त्यानंतर तिथल्या एका मॅनेजरसोबत ते बोलले. त्या मॅनेजरला ते म्हणाले की, मी तुला सकाळी एक वॉइज रेकॉर्डर देईन, तो वॉइज रेकॉर्डर नंतर तू संबंधित व्यक्तीला दे. त्यानंतर सकाळी मॅनेजरनं नितीन देसाई यांचा एन.डी स्टुडिओमधील त्यांच्या रुममध्ये शोध घेतला. पण तिथे ते नव्हते. त्यानंतर तो मॅगा हॉलमध्ये गेला. मेगा हॉलमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेतला होती. तिथेच नितीन देसाई यांचा वॉइज रेकॉर्डर होता. त्या वॉइज रेकॉर्डरमध्ये काही वॉइज नोट्स आहेत. त्या वॉइज नोट्समध्ये जवळपास चार बिझनेसमनचा उल्लेख आहे.
अद्याप त्यांच्या नितीन देसाई यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण समोर आलं नसलं तरी ठराविक मुदतीत पैशाची परतफेड न केल्यामुळे नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नितीन देसाई आणि त्यांच्या पत्नीने एडलवाईस असेट रीकन्स्ट्रक्शन या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्याची परतफेड झाली नसल्याने कंपनीने त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई केली, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नितीन देसाई यांनी काही सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या चित्रपटाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अभिजीत पानसे,अमोल कोल्हे,जितेंद्र जोशी, सुबोध भावे या कलाकरांनी शोक व्यक्त केला. तसेच विनोद तावडे, सुप्रिया सुळे,सुधीर मुनगंटीवार,चित्रा वाघ या राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: