एक्स्प्लोर

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

रघुवीर यादव यांनी 'लगान'मध्ये साकारलेला भुरा सर्वांच्या लक्षात राहिला होता. रघुवीर यादव यांची भूमिका असलेले सात चित्रपट आतापर्यंत ऑस्करला पोहचले आहेत.

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या 'न्यूटन' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. साहजिकच अभिनेता राजकुमार राव आणि दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र न्यूटनमध्ये झळकलेला असा एक अभिनेता आहे, ज्याचा ऑस्करवारी करणारा हा आठवा चित्रपट आहे. हा अभिनेता म्हणजे रघुवीर यादव. अनेक चित्रपटांमधून झळकलेला मात्र प्रेक्षक-समीक्षकांकडून दुर्लक्षित राहिलेला हा चेहरा. रघुवीर यादव यांनी 'लगान'मध्ये साकारलेला भुरा सर्वांच्या लक्षात राहिला होता. रघुवीर यादव यांची भूमिका असलेले सात चित्रपट आतापर्यंत ऑस्करला पोहचले आहेत. न्यूटन हा आठवा चित्रपट आहे. सलाम बॉम्बे (1985), रुदाली (1993), बँडिट क्वीन (1993), 1947 अर्थ (1999), लगान (2001), वॉटर (2005), पिपली लाइव्ह (2010) आणि न्यूटन (2017) हे रघुवीर यादव यांची भूमिका असलेले आठ चित्रपट ऑस्करवारी करुन आले आहेत. Raghuveer-Yadav गंमतीची गोष्ट म्हणजे लहानसा पुरस्कार पटकावल्यानंतरही गगनाला हात टेकणाऱ्या अभिनेत्यांपुढे रघुवीर यादव वेगळे ठरतात. पुरस्कार वगैरे गोष्टींचं आपल्याला फारसं कौतुक नसल्याचं रघुवीर यांनी सांगितलं. 'मी याबाबत कधी विचारच नाही करत. कारण अभिनेता म्हणून चांगली कामगिरी बजावण्याकडे माझं लक्ष असतं. ऑस्करला आपला सिनेमा जाणार का, याकडे मी बघत नाही. जर चित्रपट चांगला असेल, तर लोकप्रियता मिळणारच. तो त्या चित्रपटाचा हक्कच असतो' असं रघुवीर यादव यांना वाटतं. आपल्या व्यक्तिरेखेच्या निवडीबाबत मात्र रघुवीर यादव कायम सजग असतात. 'जे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतील, असं वाटतं, तेच मी करतो. जर पटकथा चांगली असेल, तर व्यावसायिक पातळीवर किंवा पुरस्कारांमध्ये सिनेमाला यश मिळेल, याची खात्री मिळते. दिग्दर्शकाची संवेदनशीलता सर्वात महत्त्वाची असते', असं रघुवीर यादव म्हणतात. 'व्यावसायिक चित्रपट चांगले नसतात, हा समज चुकीचा आहे. जर चांगल्या हेतूने चित्रपट तयार करण्यात आले, तर ते चांगलेच ठरतात. मी भूमिका केलेल्या ज्या सिनेमांना ऑस्कर नामांकन मिळालं, ते नफा-तोट्याचं गणित बाजुला ठेवून बनवण्यात आले होते.' असंही रघुवीर यादव यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget