एक्स्प्लोर

NEW OTT Release: डेडपूल-वुल्‍वरीनचा ब्रोमांस, देशाच्या फाळणीच्या कहाणीसोबतच बरंच काही; 8 नव्या सीरिज 'या' आठवड्यात धुमाकूळ घालणार

NEW OTT Release: नवीन आठवड्याला सुरुवात झाली असून यंदाच्या आठवड्यात ओटीटी जगात नव्या सीरिज आणि मूव्ही रिलीजचे वारे देखील सुरू झाले आहेत. या आठवड्यात, वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर 8 नवे चित्रपट आणि सीरिज येत आहेत, ज्या तुमच्या वॉचलिस्टमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात. यामध्ये ऐतिहासिक नाटकांपासून अगदी क्राईम थ्रिलरपर्यंत सर्व काही आहे.

NEW OTT Release: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मनोरंजनासाठी ओटीटीचं जग सज्ज झालं आहे. गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरीही, या आठवड्यात, विशेषत: वीकेंडमध्ये ओटीटी बॉक्समध्ये बरंच काही आहे. एकीकडे निखिल अडवाणीची 'फ्रीडम ॲट मिडनाईट' ही मालिका प्रदर्शित होत आहे, जी आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या जवळ घेऊन जाते, तर दुसरीकडे मार्व्हलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'डेडपूल आणि वूल्व्हरिन' देखील आता उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे 'कोब्रा काई' या सुपरहिट मालिकेचा नवा सीझन, 8 चित्रपट आणि 'रॉब पीस' ते 'से नथिंग' सारख्या सीरिजही प्रदर्शित होत आहेत. 

Deadpool & Wolverine (November 12)

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या 34 वा चित्रपट 'डेडपूल अँड वुल्व्हरिन'नं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन यांच्या जोडीनं आणि त्यांच्या ब्रोमन्सनं जगभरात 11,300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा चित्रपट गेल्या महिन्यात OTT वर रेंटवप उपलब्ध होता. पण आता तुम्ही हा चित्रपट रेंटशिवाय पाहू शकणार आहात. कहाणी टाईम व्हेरिएंट अथॉरिटी (TVA) पासून सुरू होते, जिथे डेडपूलला MCU च्या टाईमलाईनमध्ये सर्वनाश होण्यापासून विश्वाचं रक्षण करायचं आहे. यासाठी त्याला वुल्व्हरिनच्या पाठिंब्याची गरज आहे. तो वेगवेगळ्या मल्‍टीयूनिवर्सचा प्रवास करतो आणि जेव्हा दोघे भेटतात तेव्हा ते एकच खळबळ माजवतात. तुम्ही 12 नोव्हेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर 'Deadpool and Wolverine' पाहू शकता.

Freedom At Midnight (November 15)

डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या 'फ्रीडम ॲट मिडनाईट' या पुस्तकापासून प्रेरित असलेली ही मालिका एक ऐतिहासिक ड्रामा आहे. निखिल अडवाणी यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्याभोवतीची सामाजिक-राजकीय गुंतागुंत आणि 1947 ची फाळणी दाखवणाऱ्या या कादंबरीच्या नावावरून त्यांनी सीरिजचं नावही ठेवलं आहे. या मालिकेत जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत सिद्धांत गुप्ता, महात्मा गांधींच्या भूमिकेत चिराग वोहरा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत राजेंद्र चावला आणि मोहम्मद अली जिना यांच्या भूमिकेत आरिफ झकेरिया आहेत. याशिवाय या मालिकेत इरा दुबे फातिमा जिना यांची भूमिका साकारत आहे, तर मलिष्का मेंडोन्सा पडद्यावर सरोजिनी नायडूची भूमिका साकारत आहे. ही मालिका 15 नोव्हेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म SonyLIV वर स्ट्रीम होईल.

Rob Peace (November 11)

चिवेटेल इजिओफोर दिग्दर्शित, ही ड्रामा फिल्म जेफ हॉब्स लिखित 'द शॉर्ट अँड ट्रॅजिक लाइफ ऑफ रॉबर्ट पीस' या 2014 च्या चरित्रावर आधारित आहे. रॉबर्ट पीस (जे विल) च्या जीवनाची ही कथा आहे. रॉब हा न्यू जर्सी येथील येल विद्यापीठातील लोकप्रिय विद्यार्थी आहे. त्याच्या मेहनतीमुळे त्याला शिष्यवृत्ती मिळाली. कुटुंबात आई जॅकी (मेरी जे. ब्लिज) असते, जी आपल्या मुलाच्या आव्हानात्मक सुरुवातीला उज्ज्वल भविष्य म्हणून पाहते. पण त्याचं आयुष्य बदलतं. तिचे वडील स्कीट (इजिओफोर) तुरुंगात आहेत. त्याच्यावर दोन खुनांचा आरोप आहे. रॉब त्याच्या वडिलांच्या कायदेशीर बचावासाठी पैसे गोळा करण्यासाठी ड्रग डीलिंगमध्ये अडकतो. तो धोकादायक दुहेरी जीवन जगत असतो. दरम्यान, त्याची कॉलेजमध्ये एका मुलीशीही भेट होते. दोघांमध्ये रोमान्सही सुरू होतो. 11 नोव्हेंबरपासून तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर हा चित्रपट पाहू शकाल.

Emilia Pérez (November 13)

एमिलिया पेरेझ हे जॅक ऑडियर्ड यांनी दिग्दर्शित केलेला एक म्‍युझिकल क्राईम ड्रामा आहे, ज्यात कार्ला सोफिया गॅस्कोन ही मेक्सिकन कार्टेलचा नेता जुआन 'मॅनिटास' डेल मॉन्टे आहे. ती पुरुष म्हणून जन्मली होती, पण ती स्वतःला मुलगी म्हणून पाहते. तिला शस्त्रक्रियेद्वारे स्वतःला मुलीमध्ये बदलायचं आहे. तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याच्या या धाडसी प्रयत्नात तिचा स्वतःचा मृत्यू आणि एमिलिया पेरेझच्या रूपात तिचा पुनर्जन्म घडवण्याचा समावेश आहे. ती वकील रिटा (झो सलडाना) ची मदत घेते. यामध्ये सेलेना गोमेझ एमिलियाची पत्नी जेसीची भूमिका साकारत आहे. 13 नोव्हेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर गुन्ह्यांचे जग, गुंतागुंतीचे नाते आणि स्वत:चा शोध यातील बारकावे यांचा मेळ घालणारा हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

Cross (November 14)

जेम्स पॅटरसन यांच्या 'ॲलेक्स क्रॉस' या अतिशय लोकप्रिय कादंबरीवर आधारित या क्राईम सीरिजमध्ये ॲल्डिस हॉज मुख्य भूमिकेत आहे. तो वॉशिंग्टनमध्ये राहणारा एक हुशार गुप्तहेर आणि फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ आहे. खुनी आणि पीडित दोघांचं मन समजून घेण्याची विलक्षण क्षमता त्याच्याकडे आहे. आठ एपिसोडमध्ये तो आठ वेगवेगळ्या केसेस सोडवतो. विशेष म्हणजे, ही मालिका 14 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार असली तरी त्याच्या दुसऱ्या सीझनलाही त्याआधी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.

Say Nothing (November 14)

'से नथिंग' हा उत्तर आयर्लंडमधील समस्यांवर आधारित इमोशनल ड्रामा आहे. याची सुरुवात 1972 मध्ये दहा मुलांची आई असलेल्या जीन मॅककॉनव्हिलच्या अपहरणापासून होते. लोला पेटीक्रू आणि हेझेल डुपे डोलोरेस आणि मॅरियन प्राइसची भूमिका करतात, या दोन बहिणी विचारधारा आणि कौटुंबिक मूल्यांनी बांधल्या आहेत. अँथनी बॉयल एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे जो स्वत:मध्येही अडकतो. जोश फिननने गेरी ॲडम्सची भूमिका केली आहे, ज्याचा राजकीय वारसा वादात आहे. ही ड्रामा वेब सिरीज पॅट्रिक राडेन कीफे यांच्या पुस्तकावर आधारित आहे. तुम्ही ते 14 नोव्हेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर पाहू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget