'काका'वर क्रश, पुतण्यासोबत लग्न; कपूर कुटुंबातील सुनेची रंजक प्रेमकहाणी
Neetu Kapoor Birthday : कपूर कुटुंबाच्या सुनेचं काकावर प्रेम जडलं होतं, पण तिने लग्न पुतण्यासोबत केलं. नीतू सिंगची रंजक लव्ह स्टोरी जाणून घ्या.
!['काका'वर क्रश, पुतण्यासोबत लग्न; कपूर कुटुंबातील सुनेची रंजक प्रेमकहाणी Neetu Singh Birthday ranbir kapoor mother neetu Kapoor had crush on uncle shammi kapoor married his nephew rishi kapoor actress revealed in interview marathi news 'काका'वर क्रश, पुतण्यासोबत लग्न; कपूर कुटुंबातील सुनेची रंजक प्रेमकहाणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/4960bc94ab2d94d9840fe0484e97a1331720377575893322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Neetu Kapoor Birthday : अभिनेत्री नीतू सिंह हिने 60, 70 आणि 80 च्या दशकात रुपेरी पडदा गाजवला. आज 8 जुलै रोजी नीतू कपूरचा 66 वा वाढदिवस आहे. नीतू कपूर म्हणजे आधीची नीतू सिंह. नीतू सिंह यांनी बालकलाकार म्हणून फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तरुणपणात त्यांनी आघाडीच्या अभिनेत्यांसोबत रुपेरी पडदा गाजवला. अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानं ती नीतू कपूर झाली. तीन दशकं गाजवलेल्या या अभिनेत्रीने लग्नानंतर बॉलिवूडपासून लांब राहणं पसंत केलं. नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा रंजक लव्ह स्टोरीबद्दल जाणून घ्या.
काकावर क्रश पुतण्यासोबत लग्न
नीतू कपूर यांनी त्यांच्या क्रशबद्दल खुलासा करताना सांगितलं होतं की, त्यांना ऋषी कपूर यांचे काका शम्मी कपूर खूप आवडायचे. शम्मी कपूर यांना रुपेरी पडद्यावर पाहता क्षणी त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. पण, नीतू शम्मी कपूर यांच्या पुतण्यासोबत लग्न केलं. 1980 मध्ये नीतू यांनी शम्मी कपूर यांचा पुतण्या ऋषी कपूरसोबत लग्न केलं.
करण जोहरच्या शोमध्ये नीतू सिंह यांचा खुलासा
नीतू सिंह यांनी एका मुलाखीदरम्यान हा खुलासा केला होता. नीतू सिंग यांनी त्यांच्या काळातील स्टार अभिनेत्री झीनत अमानसोबत कॉफी विथ करण शोच्या एका भागात हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या तरुणपणापासूनचे बॉलिवूडमधील अनेक किस्से उघड केले. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला होता.
बॉलीवूडमध्ये कपूर कुटुंबाचे नाव अग्रक्रमावर घेतलं जातं. कपूर घराण्याची चौथी पिढी आता बॉलिवूडवर राज्य करत आहे. याआधी कपूर घराण्याच्या तीन पिढ्यांनीही आपल्या स्टाईलने देशाला वेड लावले आहे. कपूर कुटुंबाच्या वैयक्तिक जीवनातील कथा कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
नीतू सिंग यांच्या क्रशची कहाणी
बॉलीवूडची दिग्गज नायिका आणि कपूर घराण्याची सुन असलेल्या नीतू सिंग यांनी मुलाखतीत खुलासा करताना सांगितलं होतं की, तरुणपणात ऋषी कपूरचे काका तिचे क्रश होते. त्यांच्या हृदयात शम्मी कपूर यांच्यासाठी खास स्थान होतं. पण नंतर त्यांनी त्यांच्या पुतण्याशी लग्न केलं आणि एका सुपरस्टार मुलाला जन्म दिला. नीतू सिंग यांचं शम्मी कपूरवर खूप प्रेम होतं, हे ऐकून करण जोहरलाही धक्का बसला.
ऋषी कपूरसोबत लग्न
नीतू सिंग यांनी सांगितलं की, त्यांना शम्मी कपूर खूप आवडायचे. पण त्यांनी ऋषी कपूसोबत लग्न केलं. नीतू सिंह यांनी 22 जानेवारी 1980 रोजी ऋषी कपूरसोबत लग्न केलं. लग्नाआधी नीतू सिंग आणि ऋषी कपूर दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात नीतू सिंगची मुलगी 'रिद्धिमा कपूर'चा जन्म झाला. त्यानंतर 2 वर्षांनी 1982 मध्ये रणबीर कपूरचा जन्म झाला. रणबीर सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. रणबीर कपूरची आवड आजोबा राज कपूर यांच्यासारखीच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)