Neena Gupta Troll : ही तर उर्फीची आजी... शॉर्ट्स घातल्याने अभिनेत्री नीना गुप्ताला ट्रोल करणाऱ्यांवर चाहते संतापले
Neena Gupta Gets Trolls : पंचायत-3 वेब सीरिजचे नुकतेच स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला नीना गुप्ता ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. पण, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नीनाच्या या ग्लॅमरस लूकवरून तिला ट्रोल केले.

Neena Gupta Gets Trolls : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नीना गुप्ताची भूमिका असलेली पंचायत (Panchayat Web Series) वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पंचायत-3 ची प्रेक्षकांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आज संपली. 'पंचायत-3' (Panchayat Web Series) वेब सीरिजचे नुकतेच स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला नीना गुप्ता ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. पण, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नीनाच्या या ग्लॅमरस लूकवरून तिला ट्रोल केले. तर, नीनाच्या चाहत्यांनी तिचा बचाव करत तूी सुंदर दिसत असल्याचे म्हटले.
'पंचायत-3' च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी नीना गुप्ताने व्हाईट कलरचा को-ऑर्डर सेट घातला होता. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. काही नेटकऱ्यांना तिची हा लूक आवडला नाही. त्यांनी नीना गुप्तावर टीका सुरू केली.
ही तर उर्फीची आजी...
सोशल मीडियावर नीना गुप्ताच्या या फोटो, व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी नीना गुप्ताच्या वेशभूषेवर टीका केली. काहींनी अतिशय घाणेरड्या शब्दात नीना गुप्ता यांच्यावर टीका केली. काहींनी नीना गुप्ता यांना म्हातारी असे संबोधले. तर, काहींनी ही तर उर्फी जावेदची आजी असल्याचे म्हटले. नीना गुप्ताचे ट्रोलिंग होत असल्याचे पाहून चाहत्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
ट्रोलर्सवर नीना गुप्ताचे चाहते संतापले...
ट्रोलर्सवर नीना गुप्ताचे चांगलेच संतापले. काहींनी नीनावर कमेंट करणारे जळतात असे म्हटले. नीना गुप्ताला तिच्या वयावरून ट्रोल करणाऱ्यांना एका युजरने म्हटले की, लोक इतकी जळतात का? ती एक आनंदी महिला आहे. एका युजरने म्हटले की, मी जेव्हा एखाद्या महिलेला स्वत:ची काळजी घेताना पाहते तेव्हा मला आनंद वाटतो. लोक काय म्हणतील याची काळजी न करता एखादी महिला पुढे जाते तेव्हा खूप छान वाटते.
'पंचायत-3' चे स्ट्रीमिंग
पंचायत-3 या वेब सीरिजमध्ये नीना गुप्ताशिवाय, जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय आणि फैसल मलिक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
'पंचायत 3'च्या निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्या दिवशी मोठा फटका
'पंचायत 3' या सीरिजची प्रेक्षक गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. पण सीरिज रिलीज झाल्या-झाल्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ही सीरिज एचडीमध्ये ऑनलाईन लीक झाली आहे.























