एक्स्प्लोर

Nayana Apte : ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेंच्या कला योगदानाला सांगीतिक वंदन; कालिदास नाट्यगृहात 'अमृतनयना' कार्यक्रमाचं आयोजन

Nayana Apte : अष्टपैलू अभिनेत्री नयना आपटे यांच्या कारकिर्दीचा गौरव करण्यात आला आहे. कालिदास नाट्यगृहात 'अमृतनयना' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Nayana Apte : अष्टपैलू अभिनेत्री नयना आपटे (Nayana Apte) यांच्या कला योगदानाला सांस्कृतिक मानवंदना देण्यासाठी मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नयना आपटेंच्या कारकीर्दीला 70 आणि त्यांनी वयाच्या पंचाहात्तरीत प्रवेश केल्याबद्दल संस्कृती सेवा न्यास आणि सवाईगंधर्व यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृतनयना' हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान 

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ (Ashok Samel) यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पंडित मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित यांनी गीतं सादर केली. तर गायत्री दीक्षित यांनी नृत्याविष्कार सादर केला. मंगला खाडिलकर यांनी नयनाताईंची मुलाखत घेतली. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तपस्या नेवे आणि अमेय रानडे यांनी केलं. यावेळी नयना आपटे यांच्या 'प्रतिबिंब'  पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशनही करण्यात आलं. पत्रकार नागेश धावडे या पुस्तकाचं शब्दांकन करतायत.  तर, जाऊ मी सिनेमात? या शांता आपटेंच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही यावेळी पार पडलं.

Nayana Apte : ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेंच्या कला योगदानाला सांगीतिक वंदन; कालिदास नाट्यगृहात 'अमृतनयना' कार्यक्रमाचं आयोजन

नयना आपटेंच्या कला योगदानाला सांगीतिक वंदन 

वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपट व रंगाभूमीवर कामे करीत विविधांगी भूमिका साकारल्या. बदलत्या काळाप्रमाणे बदल स्वीकारत सर्व माध्यमांमध्ये टिकून राहत त्यांची वाटचाल आजही सुरूच आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीला 70 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या गुणी अभिनेत्रीला मानवंदना तसेच त्यांच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ मुंबईत ‘अमृतनयना’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Nayana Apte : ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेंच्या कला योगदानाला सांगीतिक वंदन; कालिदास नाट्यगृहात 'अमृतनयना' कार्यक्रमाचं आयोजन

नयना आपटेंबद्दल जाणून घ्या.. (Who is Nayana Apte)

आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कर्तबगारीने यश, कीर्ती मिळवीत असताना अभिनेत्री नयना आपटे यांनी अनेक अडथळे पार केले. त्यांच्या आयुष्याचा आणि कलेचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास आता एका  वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे.

आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने शांता आपटे (Shanta Apte) यांनी रूपेरी पडद्यावर राज्य केले. त्यांच्या चित्रपटांनी त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करत चित्रपटाच्या इतिहासात “शांता आपटे” हे नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं गेलं. साहजिकच शांता आपटे यांची कन्या म्हटल्यावर नयना आपटे यांच्यावर तशी फार मोठी जबाबदारी होती. अभिनया बरोबरच आपल्या कष्टाने त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत शिकून घेतले. त्याचप्रमाणे नृत्यशिक्षणही त्यांनी घेतले.

संंबंधित बातम्या

Majha Katta : वयाच्या 12 व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात गायलेले पंडित अजय पोहनकर! 'माझा कट्ट्या'वर उलगडली सुपरहिट 'पिया बावरी' अल्बमची गोष्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Embed widget