एक्स्प्लोर
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या 22 वर्षांच्या तरुणाला नाशिक पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. राज पाटील या हॉटेल व्यावसायिकाला आरोपी हर्षद सपकाळनं तब्बल 9 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातला.
हॉटेल व्यावसायिक राज पाटील यांच्या भाचीला सिनेमात काम करण्याची इच्छा होती. हर्षद सपकाळनं त्यांना अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'गोंधळ' सिनेमात रितेशच्या बहिणीचा रोल मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. याला भुललेल्या राज पाटील यांनी हर्षदला लाखो रुपये दिले.
काही महिने उलटल्यानंतर हर्षद सपकाळचा फोन नॉट रिचेबल येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच राज पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पाटील यांच्या तक्रारीनुसार आरोपीला अटक करण्यात आली.
हर्षद स्वतःला harry saps modeling institute चा संचालक असल्याचं सांगायचा, इन्स्टिट्यूटच्या नावाखाली अनेक ऑडिशन्स घ्यायचा. त्यासाठी शहरात कॉलेजजवळील परिसरात होर्डिंग्स किंवा पेपरमधून जाहिराती देत मैत्रिणीच्या माध्यमातून तो सावज हेरायचा. या आरोपीनं अजून कुणाला गंडवलं असेल तर त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement