Nana Patekar : 50 वर्षांच्या करिअरमध्ये एकाही दिग्दर्शकाने सिनेमासाठी विचारणा केली नाही; नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी नुकत्याच एका चित्रपट महोत्सात त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
Nana Patekar : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या चर्चेत आहेत. नानांनी 8 डिसेंबर 2023 रोजी तिरुंवनंतपुरम येथील केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स्वात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या महोत्सवात नानांनी त्यांच्या मनातील एक खंत व्यक्त केली.
नाना पाटेकर नेहमीच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपत्र महोत्सावत हजेरी लावत असतात. नुकत्याच पार पडलेल्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) ते सहभागी झाले होते. या महोत्सवाचे हे 28 वे वर्ष आहे. या महोत्सवाच्या उद्धाटनादरम्यान नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती. मल्याळम सिनेसृष्टीबद्दल बोलताना नाना म्हणाले,"गेल्या 50 वर्षांत केरळमधील एकाही दिग्दर्शकाने मला सिनेमासाठी संपर्क केलेला नाही".
नाना पाटेकर काय म्हणाले?
नाना पाटेकर म्हणाले,"गेल्या पाच दशकांत मला मल्याळम मनोरंजनसृष्टीत काम करण्याची एकही संधी मिळालेली नाही. 50 वर्षांच्या करिअरमध्ये एकाही केरळ दिग्दर्शकाने मला त्याच्या सिनेमासाठी विचारणा केलेली नाही. एकंदरीतच अभिनेता म्हणून माझ्यात सुधारणा होणं गरजेचं आहे".
आयएफएफके या चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटनादरम्यान नाना पाटेकर म्हणाले,"केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मला आमंत्रित केल्याबद्दल आणि माझा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार. 32 वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या शूटिंगसाठी मी पहिल्यांदा केरळला आलो होतो. केरळच्या सामाजिक-राजकारण परस्थितीत काहीही बदललेलं नाही. केरळसारखे लोक सर्वत्र असायला हवेत".
आयएफएफकेच्या उद्धाटनादरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन उपस्थित होते. दरम्यान केन्याई फिल्म निर्माते वानूरी काहिऊ यांच्या स्पिरिट ऑफ सिनेमा अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. एक आठवड्याच्या या महोत्सवात 81 देशांतील 175 सिनेमे दाखवले गेले.
नाना पाटेकरांबद्दल जाणून घ्या... (Who is Nana Patekar)
नाना पाटेकर हे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. नायक, सहनायक, खलनायक अशा सर्व पद्धतीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्यांचा 'नटसम्राट' हा सिनेमा चांगलाच गाजला. नानांनी 'गमन' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नानांचे माफीचा साक्षीदार, अपहरण, आँच, तिरंगा, देऊळ, नटसम्राट, परिंदा, डॉ. प्रकाश बाबा आमटे, हुतूतू असे अनेक सिनेमे गाजले आहेत. फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नाना पाटेकर यांचा 'द व्हॅक्सीन वॉर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता नानांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. नानांचा जर्नी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या