एक्स्प्लोर
मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो : नागराज मंजुळे

मुंबई : सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही, मात्र माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. त्यामुळेच मी खेद व्यक्त करतो, असं नागराज मंजुळेंनी म्हटलं आहे.
फेसबुक पोस्टवर नागराज म्हणतात, "सैराटला अनेकदा अतार्किक रितीने अनेक घटनांशी उगीच जोडले जात आहे, हे अत्यंत गमतीशीर आहे असं मला म्हणायचं होतं. मात्र घाईगडबडीत जाताजाता 'हे गमतीशीर आहे' या माझ्या 'एका शब्दाच्या' प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला, याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. माननीय रामदास आठवलेजींचा मी प्रचंड आदर करतो. माझ्या शब्दाचा विपर्यस्त अर्थ निघाला याबद्दल मला खेद वाटतो आहे. आठवले साहेबांना प्रत्यक्ष फोन करून मी हा खुलासा केला आहे. कुणालाही दुखावावं इतका उद्धट मी नाही मात्र नकळत झालेल्या या विपर्यस्त घटनेबद्दल मी जाहिर दिलगीरी व्यक्त करतो".
मराठा मोर्चा, सैराट आणि रामदास आठवले
मराठा समाजाकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र मराठा समाजाच्या आक्रोशासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सैराट चित्रपटाला जबाबदार धरलं होतं.
जातीच्या पलीकडे जाऊन तरूण संघटीत होत असल्याचं चित्र सैराटमध्ये दाखवलं आहे. त्याचाच राग मराठा समाजाच्या मनात खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली होती. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलं होतं.
आठवलेंच्या वक्तव्यावर नागराजची प्रतिक्रिया
आठवलेंच्या याच वक्तव्यावर नागराज मंजुळेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावेळी नागराज यांनी त्यावर मी काही बोलणार नाही, ते सगळंच गमतीशीर आहे, अशी प्रतिक्रिया हसतहसत दिली होती.
संबंधित बातम्या
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अयोग्य, मात्र... : नागराज मंजुळे मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्रीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
