(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagarjuna on Maldives Lakshadweep : "मोदींचा अपमान खपवून घेणार नाही"; दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन मालदीवला न जाता लक्षद्वीपला जाणार
Nagarjuna On Maldives Lakshadweep : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने लक्षद्वीपला पाठिंबा देत मालदीवला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagarjuna Cancelled Maldives Trip : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) सध्या चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मालदीवला (Maldives) न जाता लक्षद्वीपला (Lakshadweep) जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी टिप्पणी केली आणि नवा वाद सुरू झाला. आता अभिनेता नागार्जुनने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत मालदीवला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलुगू स्टार नागार्जुनने मालदीव ट्रिप रद्द केली आहे. तसेच लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे. नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने त्याचा निर्णय बदलला. संगीतकार एमएम किरावनीसोबत बोलताना नागार्जुनने लक्षद्वीपबद्दल भाष्य केलं आहे.
I am cancelling my trip to Maldives because what they said to our Prime Minister is not right - Tollywood Super Star Nagarjuna 🔥
— Viक़as (@VlKAS_PR0NAM0) January 14, 2024
Massive Respect.. Country first 🇮🇳 pic.twitter.com/9ONNWLSNCt
नागार्जुन म्हणाला,"17 जानेवारी 2024 रोजी सुट्टीसाठी मी मालदीवला जाणार होतो. कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी मी मालदीवला जाणार होतो. 'बिग बॉस' आणि 'ना सामी रंग'नंतर आता मी मालदीवला सुट्टीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे".
नागार्जुनने केलं बॉयकॉट मालदीव
नागार्जुनने आता 'बॉयकॉट मालदीव' हे सुरू केलं आहे. नागार्जुनने आता मालदीवची ट्रिप रद्द करुन लक्षद्वीपला जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यातच तो लक्षद्वीपला जाईल. मालदीवचा वाद सुरू नसताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. पण आता नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपची वेगळी ओळख करुन दिली आहे".
नागार्जुनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Nagarjuna Upcoming Movies)
नागार्जुन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेत्याच्या आगामी 'ना सामी रंगा' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याआधी नागार्जुनचा 'द घोस्ट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला.
नागार्जुनसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी मालदीव, लक्षद्वीप प्रकरणावर भाष्य केलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सलमान खान (Salman Khan) आणि कंगना रनौतसह (Kangana Ranaut) अनेक सेलिब्रिटींनी याप्रकरणावर भाष्य केलं आहे. अनेक बॉलिवूडकर आता मालदीवला न जाता लक्षद्वीपला जात आहेत.
संबंधित बातम्या