एक्स्प्लोर

Gautami Deshpande : गौतमी देशपांडेच्या आजोबांचे निधन; पोस्ट शेअर करत म्हणाली,"तीन अंकी नाटक इथेच संपलं"

Gautami Deshpande : गौतमी आणि मृण्मयी देशपांडेच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

Gautami Deshpande Post Grandfather Death : मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे (Arvind Kane) यांचे निधन झाले आहे. अरविंद काणे हे मृण्मयी (Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) यांचे आजोबा होते. काही दिवसांपूर्वी गौतमीसोबत त्यांनी 'माझा होशीन ना' या मालिकेत काम केलं होतं. आता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. आजोबांच्या निधनानंतर गौतमीने 'तीन अंकी नाटक इथेच संपलं', असं म्हणत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

गौतमी देशपांडेची पोस्ट काय आहे? (Gautami Deshpande Post)

आजोबांचा फोटो शेअर करत गौतमीने लिहिलं आहे,"प्रिय आजोबा...पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला. आज माझ्या आजोबांची, आईच्या मामा बाबांची, आजीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळ्या भूमिका असलेलं तुमचं तीन अंकी नाटक इथेच संपलं. पण आजोबा काय सांगू तुम्हाला..इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपलं तुम्ही..कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं 'तो मी नव्हेच' म्हणत राहीलात .. असे आयुष्याचे खरे खुरे 'किमयागार' ठरलात . 'चाणक्य' बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही".

View this post on Instagram
 
A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

गौतमीने पुढे लिहिलं आहे,"प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन् काय नको असं वाटतंय. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारे आयुष्यभर. तुम्ही आता मात्र शांत व्हा..दमला असाल तुम्ही..खऱ्या अर्थाने पडदा पडला आहे. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे. तुमच्यातला हा नट आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू. तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य..झालेत बहू, असतील बहू, होतील बहू पण या सम हा..रंगदेवतेचा वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते..अन् त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते". 

गौतमी आणि मृण्मयी यांचे आजोबा अरविंद काणे यांनी 1953 पासून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. गौतमी आणि मृण्मयीसोबत आजोबांचं अत्यंत जवळचं नातं होतं. त्यामुळे आता आजोबांच्या निधनानंतर गौतमीने भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

संबंधित बातम्या

Mrunmayee Deshpande: मृण्मयी आणि गौतमीनं शेअर केले खास फोटो; फोटोवर नेटकऱ्यांनी केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget