एक्स्प्लोर

Movies Release In August 2023 : 'गदर 2' ते 'सुभेदार'; ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Bollywood Movies : ऑगस्ट महिन्यात विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Movies Release In August 2023 : सिनेप्रेमींसाठी ऑगस्ट (August) महिना खूपच धमाकेदार असणार आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

गदर 2 (Gadar 2) 
कधी होणार रिलीज? 11 ऑगस्ट 2023

'गदर 2' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अनिल शर्माने (Anil Sharma) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Amisha Patel) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमात सनी तारा सिंहच्या आणि अमीषा पटेल सकीनाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

ओएमजी 2 (OMG 2)
कधी होणार रिलीज? 11 ऑगस्ट 2023

खिलाडी कुमारचा 'ओएमजी' (OMG) हा बहुचर्चित सिनेमा 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षयच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत या सिनेमाची गणना होते. आता 'ओएमजी 2' या सिनेमात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

तारीक (Tarik)
कधी होणार रिलीज? 15 ऑगस्ट 2023

'तारीक' (Tarik) या सिनेमामुळे अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) चर्चेत आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरुण गोपालनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून जॉन स्वत: या बहुचर्चित सिनेमाचा निर्मातादेखील आहे. 

अकेली (Akelli)
कधी होणार रिलीज? 18 ऑगस्ट 2023

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. तिच्या आगामी सिनेमांच्या यादीत 'अकेली' या सिनेमाचाही समावेश आहे. हा सिनेमा 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अकेली'चं मोशन पोस्टर आऊट झालं असून प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. 

ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2)
कधी होणार रिलीज? 25 ऑगस्ट

2019 मध्ये आलेला 'ड्रीम गर्ल' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. 'ड्रीम गर्ल 2'चा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमा पूजा भट्ट आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत. 

सुभेदार (Subhedar)
कधी होणार रिलीज? 18 ऑगस्ट

'सुभेदार' मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. अजय पुरकर या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

August OTT Release List: ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार वेब सीरिज आणि चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget