अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नाची तारीख ठरली, गोव्यात बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात
Mouni Roy Wedding : अभिनेत्री मौनी रॉय लवकरच बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त आहे.
Mouni Roy Wedding : आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मौनी रॉय हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माम केले आहे. मौनी रॉय हिने आधी टीव्ही जगतात वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमध्येही गेवगेळ्या भूमिका केल्या.. नेहमीच आपल्या पोस्टमुळे चर्चेत असणारी मौनी राय तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री मौनी रॉय लवकरच बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त आहे. गोव्यात हा विवाहसोहळा रंगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मौनी रॉय 27 जानेवारी 2022 रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मौनी राय दुबई राहणारा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारशी लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गोव्यात बीच वर या जोडीचे लग्न होणार आहे. मौनी रॉयच्या या डेस्टिनेशन वेडिंगला तिचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडमधील काही मोजके कलाकारही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लग्न सोहळ्यासाठी मौनी राय हिने गोव्यात फाईव्ह स्टार हॉटेल रेंटवर घेतलं आहे. सुत्रानुसार, पाहुणेमंडळी या हॉटेलमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मौनी रॉय अनेक वर्षांपासून दुबई स्थित बिझनेसमन सूरज नांबियारला डेट करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियार आधी दुबईमध्येच लग्न करण्याचा विचार करत होते पण आता त्यांनी त्यांचा प्लॅन बदलला आहे आणि ते गोव्यात भव्य लग्न करणार आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या कूचबिहार त्यांच्या मूळ जिल्ह्यात रिसेप्शन होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Mouni Roy Bachelor Party : मौनी रॉयची गोव्यात गुप्त बॅचलर पार्टी, मैत्रिणीने शेअर केले खास फोटो
सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनसोबत ओळख करून घेण्यासाठी पिंकीला पैसे दिले : ईडी
Movies Release in 2022: ‘लाल सिंह चड्ढा' ते 'आरआरआर'; 2022 मध्ये 'हे' चित्रपट करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live