एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मोदी का गाव' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
मुंबई: बिहारमधील एक चित्रपट निर्माते सुरेश झा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा आणि देश बदलण्याच्या दृष्टीकोनावर आधारित सिनेमा तयार करत आहेत. हा सिनेमा पंतप्रधान मोदींचा बायोपिक नसून, त्याचं प्रीमियर अतिशय भव्य आहे, अशी माहिती झा यांनी दिली. या सिनेमाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
मुंबईमधील उद्योजक आणि पंतप्रधान मोदींप्रमाणे दिसणारे विकास महांते या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहेत. याशिवाय या सिनेमात टेलिव्हीजन अभिनेता चंद्रमणी एम. आणि जेबा ए. असे महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
बिहारमध्ये आलेल्या महापूरात जेबा वाहून जाते. तेव्हा तिला एक स्वयंसेवी संस्था वाचवते. यानंतर ही संस्था जेव्हा तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवते. तेव्हा तिथे मोदींचा दृष्टीकोन आणि देशाच्या विकासासाठी त्यांची तळमळ पाहून ती प्रभावित होते. आणि अमेरिकेतून पुन्हा मायदेशी परतते, अशी साधारण कथा असल्याची माहिती सुरेश झा यांनी दिली.
या सिनेमाचे शूटिंग पटना, दरभंगा आणि मुंबईत झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ट्रेलर पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement