![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mismatched Season 3 : डिंपल आणि ऋषी पुन्हा येतायत, Mismatched चा तिसरा सीजन लवकरच येणार भेटीला, नवा कोरा प्रोमो आला समोर
Mismatched Season 3 : नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित Mismatched या सिरिजचा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Mismatched Season 3 : डिंपल आणि ऋषी पुन्हा येतायत, Mismatched चा तिसरा सीजन लवकरच येणार भेटीला, नवा कोरा प्रोमो आला समोर Mismatched Netflix series 3rd Season coming soon new promo launched Rohit Saraf and Prajkta Mali detail marathi news Mismatched Season 3 : डिंपल आणि ऋषी पुन्हा येतायत, Mismatched चा तिसरा सीजन लवकरच येणार भेटीला, नवा कोरा प्रोमो आला समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/3d142b1632b75a4c30e2a18b12b78e2a1709206169896720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mismatched Season 3 : तरुणाईच्या प्रेमावर भाष्य करणारा मिसमॅच्ड (Mismatched)सिरिजचा तिसरा सीजन हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या सिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिरिजच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. अभिनेत्री प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आणि रोहित सराफ (Rohit Saraf) मुख्य भूमिकेत असलेल्या या सिरिजची बरीच चर्चा होती.
तसेच या सिरिजचे पहिले दोन सिजन देखील प्रेक्षकांच्या बराच पसंतीस पडलेत. डिंपल आणि रिषी यांच्या लव्हस्टोरीमुळे ही सिरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या सीरिजमध्ये रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीसोबत रणविजय सिंह देखील पाहायला मिळाला होता. तसेच आता या सिरिजचा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तिसऱ्या सीजनचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
या तिसऱ्या सीजनमध्ये अनेक लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याच्या या नव्या प्रोमोवरुन पाहायला मिळत आहे. तसेच या नव्या सीरिजमध्ये डिंपल आणि रिषीची लव्हस्टोरी कोणतं नवं वळण घेणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार?
पहिल्या सीनजमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं ही दुसऱ्या सीजनमध्ये मिळाली होती. तसेच आता दुसऱ्या सीजनमधील डिंपल आणि रिषीची लव्हस्टोरी पुढे जाणार की पुन्हा एकदा या लव्हस्टोरीला ब्रेक मिळणार हे या तिसऱ्या सिजनमध्ये कळणार आहे. अरवलीमधील विद्यार्थ्यांच्या या गोष्टीने तुम्हाला कधी रडवलं, कधी हसवलं आणि कधी कॉलेजच्या गोड दुनियेत, अनेक ठिकाणींमध्ये नेलं. डिंपल आणि ऋषी यांच्या प्रेमाभोवती फिरणारी ही कथा रोमांचक ठरली होती.
आता या तिसऱ्या सिरिजमध्ये कोणत्या नव्या गोष्टींचा उलगडा होणार याची देखील उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यामुळे या नव्या सीजनमध्ये कोणत्या नव्या नात्यांची सुरुवात होणार आणि कोणत्या नात्याचा शेवट होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)