एक्स्प्लोर

Mirzapur 3 Ali Fazal Hints Release Date :  'पंचायत-3' मध्ये लपली आहे 'मिर्झापूर-3' च्या रिलीजची डेट, गुड्डू भैय्याने दिली हिंट

Mirzapur 3 Ali Fazal Hints Release Date :  अभिनेता अली फजल म्हणजेच मिर्झापूर गुड्डू भैय्याने रिलीज डेट बाबत हिंट दिली आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अली फजलने रिलीज डेटची हिंट दिली.

Ali Fazal Hints Mirzapur 3 Release Date:   ओटीटीवर धुमाकूळ घालणारी वेब सीरिज  'मिर्झापूर'च्या (Mirzapur)  तिसऱ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. मिर्झापूर 3 ही वेब सीरिज आता लवकरच जाहीर होऊ शकते. या वेब सीरिजच्या रिलीज डेट बाबत फारशी माहिती समोर आली नसली तरी मिर्झापूरचे कलाकार रिलीज डेटची हिंट देत आहेत. 

अभिनेता अली फजल (Ali Fazal) म्हणजेच मिर्झापूर गुड्डू भैय्याने रिलीज डेट बाबत हिंट दिली आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अली फजलने रिलीज डेटची हिंट दिली. 

अली फजलने दिली हिंट 

एका चाहत्याने म्हटले की, मी पंचायत-3 ही वेब सीरिज पाहिली नाही तर चालेल का? मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची उत्सुकता आहे. या चाहत्याला उत्तर देताना अली फजल म्हणाला की, पंचायत सीरिज पाहा,  त्यामध्ये मिर्झापूरच्या रिलीज डेटशी संबंधित एक धागादोरा लपला आहे. 

'मिर्झापूर-3' च्या रिलीज डेट बाबत अनेक तर्क लढवले जात आहे. प्राईम व्हिडीओने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या प्रकारे चाहत्यांना रिलीज डेटची हिंट देत आहे. जून महिन्यात मिर्झापूरचा तिसरा सीझन रिलीज होईल असे म्हटले जात होते. आता, मात्र जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असे वृत्त आहे.

'मिर्झापूर 3' ची कथा काय?

मिर्झापूरच्या सत्तेसाठीचा संघर्ष दिसून आला. आता मिर्झापूरच्या या तिसऱ्या सीझनमध्ये कोणता ट्विस्ट येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मिर्झापूरच्या सत्तेची गादी कोणाकडे असणार, गुड्डू भैय्या आपला दावा सांगणार का, बिना भाभी आपल्या लहान बाळाला मिर्झापूरच्या गादीवर बसवून स्वत: सगळी सूत्रे सांभाळणार का, कालीन भैय्या काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उकल होणार आहे.

'मिर्झापूर' या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. पहिला सीझन 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. या वेब सीरिजची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दुसरा सीझनही गाजला. आता मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागली आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन जून 2024 मध्ये रिलीज होणार असल्याची प्रतीक्षा होती. मात्र, आता नव्या वृत्तानुसार चाहत्यांना जुलैपर्यंत  प्रतीक्षा करावी लागू शकते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget