Justin Bieber in India : जस्टिन बिबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 18 ऑक्टोबरला दिल्लीत लाईव्ह कॉन्सर्ट
Justin Bieber : कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरचा आगामी लाईव्ह शो दिल्लीत होणार आहे.
Justin Bieber in India : कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरच्या (Justin Bieber) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जस्टिन बिबरचा आगामी लाईव्ह शो आता भारतात होणार आहे. 18 ऑक्टोबरला जस्टिनचा लाईव्ह शो नवी दिल्लीत होणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअमध्ये हा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. जस्टिन बिबरच्या या लाईव्ह कॉन्सर्टची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
याच महिन्यात जस्टिन जगभ्रमंतीला करणार सुरुवात
बूक माय शोने मंगळवारी ट्वीट करत जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्ट संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे, या वर्षातील सर्वात मोठी घोषणा... ऑक्टोबर महिन्यातील तुमचे सर्व कार्यक्रम रद्द करा आणि जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी दिल्लीत या. जस्टिन त्याच्या जगभ्रमंतींची सुरुवात या महिन्यात मॅक्सिकोपासून करणार आहे. तसेच भारतात लाईव्ह कॉन्सर्ट करण्याआधी जस्टिन दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत लाईव्ह शो करणार आहे.
#BieberFever Incoming 🚨 We're here with the biggest announcement of the year. 🤩 Cancel all your October plans and join us in Delhi for the @justinbieber #JusticeWorldTourIndia.
— BookMyShow (@bookmyshow) May 24, 2022
Register now! 👇https://t.co/0EoBpKOjUI pic.twitter.com/TnakcIAbzv
2 जून पासून होणार तिकीट विक्रीला सुरुवात
जस्टिन बिबरचे बेबी, सॉरी, लव मी, पीचेस, फेवरेट गर्ल, ऑनेस्ट, घोस्ट आणि लोनली हे शब्द जगभरात लोकप्रिय आहेत. 'जस्टिस वर्ल्ड टूर' मार्च 2022 ते मार्च 2023 दरम्यान असणार आहे. यादरम्यान जस्टिन 30 देशांत 125 पेक्षा अधिक लाईव्ह कॉन्सर्ट करणार आहे. या लाईव्ह कॉन्सर्टचे तिकीट जस्टिनचे चाहते 'बूक माय शो'वरुन विकत घेऊ शकतात. 2 जून पासून तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टची किंमत 4,000 ते 37,500 हजार पर्यंत असणार आहे.
जस्टिन बिबर दुसऱ्यांदा भारतात लाईव्ह कॉन्सर्टसाठी येणार आहे. याआधी 2017 मध्ये तो भारतात आला होता. कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर भारतातली पहिली लाईव्ह कॉन्सर्ट झाली होती. जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारला जवळपास 3 कोटी 40 लाख रुपये मिळाले होते. बिबरच्या कार्यक्रमावरील विविध टॅक्समुळे महाराष्ट्र सरकारला ही रक्कम मिळाली होती. दिल्लीतील व्हाईट फॉक्स कंपनीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी अॅडव्हान्स टॅक्स म्हणून 3 कोटी 7 लाख रुपये जमा करुन घेतले होते.
कुठे होणार लाईव्ह कॉन्सर्ट?
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअम
कधी होणार लाईव्ह कॉन्सर्ट?
18 ऑक्टोबर
तिकीट किती?
4,000 ते 37,500 हजार
संबंधित बातम्या