Telly Masala : प्रेक्षकांना आवडली तेजश्रीची 'प्रेमाची गोष्ट' ते अलका कुबल यांना 'माहेरची साडी' कसा मिळाला? जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Serials : प्रेक्षकांना आवडली तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट'! 'ठरलं तर मग' पडली मागे; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट...
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्मिते सतत मालिकेत ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानची (Tejashree pradhan) 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सलग दुसऱ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Maherchi Sadi : 'माहेरची साडी' पाहून आजही रडतात बायका; अलका कुबल यांना सिनेमा कसा मिळालेला? जाणून घ्या...
Maherchi Sadi Marathi Movie : 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) हा ब्लॉकबस्टर सिनेमा 1991 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आजही या सिनेमाची तेवढीच क्रेझ आहे. या सिनेमाचं कथानक, कलाकारांचा अभिनय अशा सर्वच गोष्टीचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. आजही अनेक घरांत हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. हा सिनेमा पाहताना आजही महिलांना अश्रू अनावर होतात. या सिनेमात अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी लक्षवेधी काम केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prathamesh Parab : बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी; प्रथमेश परबचं बाप्पाकडे मागणं
Prathamesh Parab On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पासोबत प्रत्येकाचं एक खास नातं असतं. तो कधी आपला मित्र असतो, कधी मोठा भाऊ असतो. अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि बाप्पाचंही खास नातं आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये प्रथमेशने बाप्पासोबतचं त्याचं नातं शेअर केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Eknath Shinde : "केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगत आहे असं नाही ..."; विजू मानेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी शेअर केली खास पोस्ट
Eknath Shinde : दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विजू माने यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. विजू माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Boyz 4 : 'बॉईज 4'चा चौपट धमाका; जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Boyz 4 Teaser Out : 'बॉईज 4' (Boyz 4) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. आता या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे 'बॉईज 4' या सिनेमात चौपट धमाका होणार आहे.