Maherchi Sadi : 'माहेरची साडी' पाहून आजही रडतात बायका; अलका कुबल यांना सिनेमा कसा मिळालेला? जाणून घ्या...
Maherchi Sadi : 'माहेरची साडी' हा ब्लॉकबस्टर सिनेमा 1991 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Maherchi Sadi Marathi Movie : 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) हा ब्लॉकबस्टर सिनेमा 1991 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आजही या सिनेमाची तेवढीच क्रेझ आहे. या सिनेमाचं कथानक, कलाकारांचा अभिनय अशा सर्वच गोष्टीचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. आजही अनेक घरांत हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. हा सिनेमा पाहताना आजही महिलांना अश्रू अनावर होतात. या सिनेमात अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी लक्षवेधी काम केलं आहे.
'माहेरची साडी' हा सिनेमा अलका कुबल यांना कसा मिळाला?
'माहेरची साडी' या सिनेमात अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमातील त्यांच्या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आजही करतात. पण हा सिनेमा त्यांना कसा मिळाला हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'माहेरची साडी' या सिनेमासाठी अलका कुबल यांना आधी विचारणा झाली नव्हती. अलका कुबल या मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. पण 'माहेरची साडी' या सिनेमासाठी विजय कोंडगे यांना एक नवा चेहरा हवा होता.
विजय कोंडगे यांनी 'मैने प्यार किया' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या भाग्यश्री पटवर्धन यांना 'माहेरची साडी' या सिनेमासाठी विचारणा केली होती. पण काही कारणांनी त्यांनी या सिनेमासाठी नकार दिला. भाग्यश्री यांनी नकार दिल्यानंतर विजय कोंडगे यांनी अलका कुबल यांचा विचार केला.
अलका कुबल यांनी नाकारलेला 'माहेरची साडी'
विजय कोंडगे यांनी अलका कुबल यांना 'माहेरची साडी' या सिनेमासाठी विचारणा केली होती. पण अभिनेत्रीने मात्र हा सिनेमा नाकारला. विजय कोंडगे हे कमी मानधन देणार असल्याने अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' या सिनेमासाठी नकार दिला होता. मानधनाची अपेक्षा न ठेवता अलका कुबल यांनी हा सिनेमा करावा अशी विजय कोंडगे यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत अलका कुबल यांनी सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.
'माहेरची साडी' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Maherchi Sadi Movie Details)
'माहेरची साडी' हा ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके (Vijay Kondke) यांनी सांभाळली आहे. रिलीजच्या तीन महिन्यांत या सिनेमाने 12 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. त्यामुळे त्याकाळातला सर्वाधिक कमाई करणारा 'माहेरची साडी' हा सिनेमा ठरला होता. या सिनेमातील कौटुंबिक फॅमिली ड्रामा प्रेक्षकांना चांगलाच भावला.
'माहेरची साडी' या सिनेमात अलका कुबल (Alka Kubal), अजिंक्य देव (Ajinkya Dev), उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) रमेश भाटकर (Ramesh Bhatkar), विक्रम गोखले (Vikram Gokhale), आशालता बावगांवकर (Ashalata Wabgaonkar) आणि किशोरी शहाणे (Kishori Shahane) मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर 'साजन का घर' नावाचा या सिनेमाचा हिंदी रिमेकही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात जुही चावला आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होती.
संबंधित बातम्या