एक्स्प्लोर

Eknath Shinde: "केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगत आहे असं नाही ..."; विजू मानेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी शेअर केली खास पोस्ट

विजू माने (Viju Mane) यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिलं आहे.  

Eknath Shinde:  दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विजू माने यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. विजू माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिलं आहे.  

विजू माने यांची पोस्ट

विजू माने यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेली जवळपास 20 वर्ष (कोरोनातली दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता या वर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही परंतु या व्यक्तीच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरचं सलग दुसरं वर्ष ते आमच्या घरी आले.मी, माननीय शरद पवार ह्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटी गाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. परंतु सन्माननीय एकनाथजी शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे. राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं."

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं द्योतक आहे हे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही. माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता आमच्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली माझ्या घरी गणपतीला याल का? मला माहिती होतं, साहेबांची तब्येत बरी नाहीये. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, शिवाय तापही आहे आणि तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती नाकारली नाही. मलाही त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

"कै. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान गणेशोत्सवाला आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या श्री गणेशाचे दर्शन हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत हे खचितच भूषणावह आहे." असंही विजू माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

महत्त्वाच्या बातम्या

Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
Ved Fame Actress Jiya Shankar: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget