Manoj Bajpayee : जगाचा निरोप घेण्यापूर्वी सुशांतचा इंडस्ट्रीत कोणासोबत झाला होता शेवटचा संवाद? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला, 'त्याच्याजागी कुणीही असतं तरी...'
Manoj Bajpayee : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना बराच धक्का बसला होता. दरम्यान त्याच्या जाण्यानंतर अनेक शंकाही उपस्थित केल्या जात होत्या.
Manoj Bajpayee : 'पवित्रा रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajaput) याने काही वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. टोकाचं पाऊल उचलत सुशांत आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. त्याच्या जाण्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अनेक शंका निर्माण केल्या जात होत्या. अनेकांचं म्हणणं होतं की, सुशांत हा डीप्रेशनमधून जात होता, म्हणून त्याने हा निर्णय घेतला. पण सुशांतने असा निर्णय का घेतला यावर अजूनही प्रश्नचिन्हचं आहे. पण असा निर्णय घेण्याआधी सुशांतने मनोज बाजपेयीसोबत ( Manoj Bajpayee) दहा दिवसांपूर्वीच संवाद साधला होता. त्याविषयी या अभिनेत्याने नुकताच खुलासा केला आहे.
छोटा पडदा गाजवल्यानंतर सुशांत रुपेरी पडद्याकडे वळाला. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. 'काई पो चे' या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या सिनेमापासून ते शेवटच्या सिनेमापर्यंत एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे 'मृत्यू'. 'काय पो छे', 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी', 'सोनचिरैया', 'केदारनाथ', 'बेचारा दिल' अशा अनेक सिनेमांत सुशांत महत्त्वाच्या भूमिकेत होता.
मनोज बाजपेयीसोबत शेवटचा संवाद
सुशांतने मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी मनोज बाजपेयी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी तो खरचं त्रासात होता,असा खुलासा मनोज बाजपेयी यांनी केला आहे. मनोज बाजपेयीने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. त्यावेळी त्याने सांगितलं की, सुशांत ब्लाईंड आर्टिकल्स म्हणजे ज्यामध्ये काही तथ्य नसतं, यावरुन बराच त्रासात होता. त्याच्या जागी दुसरं कोणीही असतं तरीही या आर्टिकल्समुळे वैतागलाच असता.तो मला नेहमी विचारायचा मी काय केलं पाहिजे. त्यावर मीही त्याला सांगायचो की,अशा गोष्टी फार गांभीर्याने नको घेऊस. मी त्याला अशा गोष्टी लहिणाऱ्या मारायची भाषा करायचो. पण त्यावर तो हसून मला म्हणाला होता, की सर हे तुम्हीच करु शकत मी नाही. त्याला माझ्या हातचं मटण खायचं होतं आणि मी त्याला म्हटलं की, मी बनवेन तेव्हा नक्की तुला खायला घालेन. आमच्या या संवादानंतर 10 दिवसांतच त्याने जगाचा निरोप घेतला.
'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होता. रंगभूमीवर काम करत असताना त्याने बालाजी टेलीफिल्म्समध्ये ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्यावेळी 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेच्या माध्यमातून त्याला पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याने प्रीत जुनेजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर बालाजीच्याच 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा तो भाग झाला. या मालिकेत त्याने मानव देशमुखची भूमिका वठवली होती. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला.