एक्स्प्लोर

Kushal Badrike : आयुष्यातला पहिला चित्रपट अन् वडिलांचा जाणं, 'आई संपूर्ण वेळ त्यांचा फोटो घेऊन बसली होती'; वडिलांच्या आठवणीत कुशलला अश्रू अनावर 

Kushal Badrike :  अभिनेता कुशल बद्रिकेला वडिलांची आठवण सांगताना अश्रू अनावर झाले. तसेच च्याने यानिमित्ताने एक खास किस्सा देखील सांगितला. 

Kushal Badrike :  'चला हवा येऊ द्या' (Chaha Hawa Yeu Dya)  कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता हिंदी कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोजरंन करत आहे. कुशल हा सोनी टिव्हीवरील 'मॅडनेस माचऐंगे' या कार्यक्रमात झळकत आहे. हिंदीतील कुशलचं कामही रसिकांच्या पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतंय. याआधी कुशलने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून सलग 10 वर्ष खळखळून हसवलं. कुशलने केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा या सिनेमातून 2005 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर कुशलच्या विनोदाचा प्रवास हा सुरुच आहे. 

जत्रा हा कुशलचा पहिल सिनेमा होता. या सिनेमात भरत जाधव,सिद्धार्थ जाधव यांसह अनेक दिग्गज कलाकार होते. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतं. या सिनेमातील गाणी, डायलॉग्ज आजही प्रेक्षकांना मुखोद्गत आहेत. पण या सिनेमाच्या वेळी कुशलाच्या आयुष्यात एक कठीण काळ होता. त्याचे वडिल या सिनेमाचं शुटींग सुरु असताना गेले. त्यावळच्या आठवणी कुशलने नुकत्याच शेअर केल्या आहेत. 

पहिलाच सिनेमा आणि मिळालेला परडे

मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमादरम्यान त्याच्या आयुष्यातल्या आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी कुशलने म्हटलं की, 2005 साली आलेला जत्रा हा माझा पहिला सिनेमा होता. मी नवीनच होतो. मोठा रोल होता. परडे विषयी चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. माहित नव्हतं कसं बोलायचं काय बोलायचं. त्यांनी मला 3000 रुपये सांगितले. मला वाटलं 3000 म्हणजे 30 दिवसांचे 90 हजार मला 2005 मध्ये मिळणार. मला खूप भारी वाटलं. म्हणून मी सही करायला घेतली. त्यांनी विचारलं की वाचलं आहेस ना नीट, मी म्हटलं हो, मस्तंय हे सर. त्यांनी मला सांगितलं की, 3000 हे तुझं पूर्ण पॅकेज आहे. तेव्हा मी माझ्या मित्राला फोन केला, तेव्हा तो म्हणाला तुझा पहिला सिनेमा आहे,  सिनेमात घ्यायला पैसे देतता, तुला घेऊन कोणीतरी सिनेमा करतंय, त्याचे तुला पैसे मिळतायत. येवढा मोठा रोल आहे, तू कर हा सिनेमा आणि मी तो सिनेमा केला.  

आई संपूर्ण वेळ त्यांचा फोटो घेऊन बसली होती - कुशल बद्रिके

जत्रा सिनेमाचं शुटींग सुरु झालं. एक आठवडा झाला आणि माझे वडिल गेले. त्यानंतर दुसरं शेड्युल्ड लागलं. मुंडन करतात मला ते करतात आलं नाही, कारण केसं  ही कनट्युनिटी होती सिनेमाची. सिनेमा झाला. रिलीजही झाला, मी आईला बघयला घेऊन गेलो होतो. आई माझ्या मागे बसली होती. माझं नाव पाहिलं स्क्रिनवर,इंटरवलपर्यंत सिनेमा आला. त्यानंतर मी मागे वळून पाहिलं. माझी आई माझ्या बाबांचा फोटो घेऊन सिनेमा पाहात होती, ही आठवण कुशलने शेअर केली. 

कुशलने व्हिडिओ सोशल मीडियावर केला पोस्ट 

कुशलने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर कॅप्शन देत त्याने म्हटलं की, ही गोष्ट मी कधीच कुठे share केली नव्हती; म्हणजे तसं काही जुळूनच आलं नाही कधी. आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. नाही का ? पहिलं प्रेम, पहीली नोकरी, पहिली गाडी, पहिलं घर, तसंच ही माझी माझी “पहिली फिल्म” जत्रा ! केदार सर तुम्ही संधी दिलीत आणि आयुष्याचं सोनं झाल. (आता सोनी झाली असं म्हणायला हरकत नाही.) भरत दादा तुम्ही कायम संभाळून घेतलंत . बाकी मोन्या, सिध्दू, संज्या, रम्या, गण्या ह्यांना सांगू नका हां, माझं नाव कुश्या आहे ते.

View this post on Instagram
 
A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

ही बातमी वाचा : 

Bhushan Kadu :'आमची "कादंबरी" वाचायची अर्धीच राहिली', मुलाची जबाबदारी अन् आयुष्य संपवण्याचा निर्णय; भूषण कडू पहिल्यांदाच झाला व्यक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget