Malaika Arora : ‘बाळ जन्माला घातलंस तर करिअर संपेल’, अरहानच्या जन्मावेळी अनेकांनी मलायकाला दिलेला सल्ला! आता अभिनेत्री म्हणते...
Malaika Arora : अरहान हा मलायकाचा माजी पती अरबाज खानचा मुलगा आहे. मलायका आणि अरबाजचे लग्न 1998मध्ये झाले होते आणि अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला होता. अरबाज आणि मलायका 2017मध्ये वेगळे झाले.
Malaika Arora : नुकताच जगभरात ‘मातृदिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या आईंसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) देखील तिच्या मुलाच्या जन्माचा अनुभव शेअर केला आहे. मलायका अरोरा वर्किंग मदर होण्याबद्दल आणि या मातृत्वाचा तिच्या आयुष्यावर आणि करिअरवर कसा परिणाम झाला, तसेच 'वर्किंग मदर' म्हणून तिला कसे गिल्ट वाटले, याबद्दल बोलली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा मुलगा अरहान खानसोबतच्या तिच्या नात्याचा प्रवास दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, मलायका हे देखील सांगते की, लोकांनी तिला कसे सांगितले की, गर्भधारणेनंतर तिची कारकीर्द संपेल, म्हणून मूल होऊ देऊ नको, असा सल्ला दिला होता.
अरहान हा मलायकाचा माजी पती अरबाज खानचा मुलगा आहे. मलायका आणि अरबाजचे लग्न 1998मध्ये झाले होते आणि अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला होता. अरबाज आणि मलायका 2017मध्ये वेगळे झाले, पण ते त्यांच्या मुलासाठी नेहमी एकत्र दिसते. अभिनेत्री सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
आई झाले म्हणून करिअर संपलं नाही...
अलीकडेच ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी संभाषण करताना, मलायकाने तिच्या गर्भधारणेचा काळ आठवला. या काळात ती यशाच्या शिखरावर होती. या व्हिडीओत मलायका सांगते की, ‘लोक तिला सांगायचे, मुलामुळे तुझे करिअर संपेल! मूळ जन्माला घालू नको. त्यावेळी लग्नानंतर क्वचितच कुणी अभिनेत्री काम करताना दिसत होती. पण, मी गर्भधारणेदरम्यान शटलिंग शो आणि रिहर्सल करत होते आणि जेव्हा अरहानचा जन्म झाला तेव्हा मी त्याला जगातील सगळे सुख देण्याचे वचन दिले होते. मी स्वतःलाही वचन दिले होते की, आई होण्याच्या प्रक्रियेत मी माझी ओळख गमावणार नाही. तेव्हापासून मी दोन्ही आश्वासने पूर्ण केली आहेत.’
पाहा व्हिडीओ :
प्रसूतीनंतर केवळ दोन महिन्यांत मलायकाने एक शो कसा केला आणि एका वर्षानंतर 'काल'मध्ये डान्स नंबर केला. मलायकाचा हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टचे कौतुक होत आहे.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...