अभिनेत्री एका गाण्यामुळे रातोरात बनली स्टार, लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट, 12 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमातही मिळाला धोका
Happy Birthday Malaika Arora : बॉलिवूडची सौंदर्यवान अभिनेत्री मलायका अरोरा हिचा आज 23 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. तिच्याविषयी खास गोष्टी जाणून घ्या...
Malaika Arora Birthday Special : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्यावरुन त्यांचं वय जाणं तसं अवघडचं आहे. या अभिनेत्री फिटनेस आणि स्टाईलच्या बाबती भल्या-भल्या तरुण अभिनेत्रींना मागे टाकतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती एक अभिनेत्री आणि डान्सर असण्यासोबतच एक मॉडेलही आहे. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. मलायका अरोराचा आज 51 वा वाढदिवस आहे.
एका गाण्याने रातोरात स्टार बनली स्चार
मलायका अरोराने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली होती. मलायका म्युझिक टीव्ही MTV इंडियासाठी VJ म्हणून काम करत होती. 1998 मध्ये शाहरुख खानच्या 'दिल से' चित्रपटातील 'छैया छैय्या' या आयटम नंबर केल्यानंतर मलायका अरोरा रातोरात स्टार बनली होती. 'छैया छैय्या' गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ती एक उत्तर डान्सर असून तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. याशिवाय ती मॉडेलिंगच्या जगातही खूप प्रसिद्ध होती, आजही ती मॉडेलिंग शोज जज करताना दिसते.
वयाच्या 25 व्या वर्षी केलं लग्न
मलायका अरोराने वयाच्या 25 व्या वर्षी सलमान खानचा भाऊ बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केलं. मलायका अरोराने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्नगाठ बांधली. मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाची माहिती मिळताच अनेकांना धक्का बसला होता.
View this post on Instagram
लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट झाला
मलायका अरोराने अरबाज खानसोबतच्या 19 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटाच्या घोषणेने सर्वांनाच हादरवून सोडले. खान कुटुंबाच्या या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला होता. कारण मलायकानेच एकदा अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते, त्यानंतर अखेरीस दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं आणि दोघेही खूप आनंदी आयुष्य जगत होते. पण, दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
12 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमातही मिळाला धोका
12 वर्षांनी लहान अर्जून कपूरला डेट करत असल्याने तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते. वाढदिवस असो किंवा कोणताही खास दिवस, दोघांनीही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडली नाही. पण जेव्हा यावर्षी अभिनेता अर्जुन कपूरने 26 जून रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा केला तेव्हा अभिनेत्री मलायका अरोराने वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली नाही, त्यामुळे लोक त्यांच्या ब्रेकअपबद्दल अंदाज लावू लागले. दरम्यान, मलायकाच्या सोशल मीडिया पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतलं.
अर्जुन कपूरने मलायकाला दिला धोका?
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये लिहिले आहे की, 'मला ते लोक आवडतात ज्यांच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते.' मलायका अरोराच्या या पोस्टनंतर ही पोस्ट अर्जुन कपूरसाठी लिहिली असल्याची चर्चा रंगली होती. अर्जुन कपूरने मलायकाला धोका दिला, असा अंदाज सोशल मीडिया यूजर्स लावत होते. आता दोघांचं ब्रेकअप झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :