Vedat Marathe Veer Daudale Saat: महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला, गंभीर जखमी
'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला आहे. हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
Vedat Marathe Veer Daudale Saat: दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला आहे. हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. नागेश खोबरे असं तटबंदीवरुन कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे.
चित्रपटाच्या शूटिंगचा ब्रेक सुरु असताना फोनवर बोलता-बोलता नागेशचा तोल गेला. त्यामुळे तो तटबंदीवरुन कोसळला. नागेशवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातील घोड्यांची निगा राखण्याचे काम नागेश करत होता.
'वेडात मराठे वीर दौडले सात' ची स्टार कास्ट
"वेडात मराठे वीर दौडले सात" (Vedat Marathe Veer Daudle Saat) या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटातील भूमिकेबाबत अक्षय कुमार म्हणाला...
वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली होती. यावेळी अक्षय कुमारनं या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबाबत भावना व्यक्त केल्या होत्या.
अक्षय कुमारनं वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी माहिती दिली होती. तो म्हणाला की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पहिल्यांदाच भेटत आहे. मला खूप आनंद झाला. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात मी काम करणार आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. मी सर्वांना सांगू इच्छितो की, मला या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. ते मला म्हणाले की, तू ही भूमिका कर. मी ही भूमिका साकारणार ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी खूप जबाबदारीचं काम आहे.'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Vedat Marathe Veer Daudle Saat: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कशी मिळाली? अक्षय कुमार म्हणाला...