Madhuri Dixit : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग
Madhuri Dixit Birthday : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा मोठा चाहतावर्ग आहे.
Madhuri Dixit Top 10 IMDB Rated Movies : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्यासोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांत तिने काम केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्याने आजही ती चाहत्यांना थक्क करत असते. माधुरी दीक्षितच्या वाढदिवशी जाणून घ्या अभिनेत्रीच्या लोकप्रिय सिनेमांबद्दल...
IMDb वरील माधुरी दीक्षितचे सर्वाधिक रेटिंग असलेले टॉप 10 चित्रपट (Madhuri Dixit top 10 highest IMDb-rated films)
1. प्रहार : द फायनल अटॅक (Prahaar : The Final Attack) : 'प्रहार : द फायनल अटॅक' हा सिनेमा 1991 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नाना पाटेकर यांनी सांभाळली होती. या सिनेमातील नाट्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 8 रेटिंग मिळाले आहे.
2. परिंदा (Parinda) : 'परिंदा' हा सिनेमा 1989 साली खूप गाजला होता. या सिनेमात जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट होती. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.8 रेटिंग मिळाले आहे.
3. देवदास (Devdas) : 'देवदास' हा सिनेमा 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात शाहरुख खान, ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.5 रेटिंग मिळाले आहे.
4. हम आपके है कौन (Hum Aapke Hai Koun) : 'हम आपके है कौन' हा सिनेमा 1994 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमाला 5 फिल्फेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.5 रेटिंग मिळाले आहे.
5. धारावी (Dharavi) : माधुरी दीक्षितचा 'धारावी' हा सिनेमा आयएमडीबी रेटिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.3 रेटिंग मिळाले आहे.
6. साजन (Saajan) : 'साजन' हा सिनेमा बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.2 रेटिंग मिळाले आहे.
7. खलनायक (Khalnayak) : 'खलनायक' हा सिनेमा 1993 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुभाष घईने या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात संजय दत्त, माधुरी दीक्षित व जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.
8. मृत्युदंड (Mrityudand) : माधुरी दीक्षितचा 'मृत्युदंड' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.
9. दिल तो पागल है (Dil To Pagal Hai) : 'दिल तो पागल है' हा सिनेमा 1997 साली प्रदर्शित झाला होता. यश चोप्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात शाहरुख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये या सिनेमाला 7 रेटिंग मिळाले आहे.
10. डेढ इश्किया (Dedh Ishqiya) : माधुरी दीक्षितचा 'डेढ इश्किया' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 7 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या