एक्स्प्लोर

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला

मुंबई : बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी संजय कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मुली जान्हवी आणि खुशी हे कुटुंबीय उपस्थित होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन, लारा दत्ता, विद्या बालन, अनुपम खेर, अर्जुन रामपाल यासारखे सेलिब्रिटीही उपस्थित होते. श्रीदेवी यांनी आपल्या आईच्या निधनानंतर तिच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला होता. त्यामुळे श्रीदेवींच्या दोन मुली मुखाग्नी देणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र कपूर कुटुंबाने इतिहासाची पुनरावृत्ती केली नाही. श्रीदेवीच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. LIVE TV श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार LIVE UPDATE :  4.05 PM : अभिनेता शाहरुख खान, महेश भूपती, प्रसून जोशी स्मशानभूमीत उपस्थित  SRK 4.00 PM : श्रीदेवी यांची अंत्ययात्रा विलेपार्ले स्मशानभूमीजवळ पोहचली  3.10 PM: श्रीदेवी यांची अंत्ययात्रा कोकिलाबेन रुग्णालयाजवळ पोहचली, प्रचंड गर्दीमुळे अंत्ययात्रा धीम्यागतीने  02:10 PM : पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा सुरु  बॉलीवूडची चांदणी म्हणजेच श्रीदेवीच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये श्रीदेवींचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. 01.00 PM: तासाभराने श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल, शेवटचं दर्शनासाठी चाहत्यांची बरीच गर्दी   श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार 12.10 PM: अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतलं श्रीदेवीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 11.40 AM: श्रीदेवीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 'पद्मावत'चा दिग्दर्शक संजय लीला भन्सालीही सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्बलमध्ये  11.36 AM: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनीही घेतलं श्रीदेवीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन  rekha 11.15 AM: श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी अजय देवगण, काजोल आणि जॅकलीन फर्नांडिसची अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये हजेरी 11.05 AM: श्रीदेवीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार 11.00 AM:  श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी बच्चन कुटुंबीयांची देखील उपस्थिती, जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांची सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये उपस्थिती  10.30 AM: तब्बू, अक्षय खन्ना आणि सुभाष घई यांनीही घेतलं श्रीदेवीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन tabbu 10.25 AM: ऐश्वर्या रायनेही घेतलं श्रीदेवीचं अंत्यदर्शन, थोड्याच वेळात अमिताभ बच्चनही येण्याची शक्यता 10.20 AM: श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी हेमामालिनी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये 10.00 AM: अभिनेत्री सोनम कपूर आणि दिग्दर्शक फराह खान या देखील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये पोहचल्या. 09.40 AM: करण जहर, उर्वशी रौतेला, ठाकरे कुटुंबीय आणि अरबाज खान यांनीही श्रीदेवीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं hemamalini 09.30 AM: सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सुरु, चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी 09.00 AM: अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलीस आणि एसआरपीएफनं कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काल रात्री म्हणजे तब्बल 72 तासानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यांसह, अख्खं बॉलिवूड आणि टॉलिवूडही लोटल्याचं दिसतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget