Laal Singh Chaddha: प्रतीक्षा संपली! लाल सिंह चड्ढा ओटीटीवर झाला रिलीज; 'या' प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट
लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत.
Laal Singh Chaddha On Netflix: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी केली. बॉयकॉट लाल सिंह चड्ढा या हॅशटॅगचा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत. कारण लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर सहा महिन्यांनी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियानं त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही पॉपकॉर्न आणि गोलगप्पे तयार ठेवा कारण लाल सिंह चड्ढा हा ओटीटीवर रिलीज झाला आहे. ' या पोस्टमध्ये लाल सिंह चड्ढाचं पोस्टर देखील शेअर करण्यात आलं आहे.
निर्मात्यांनी निर्णय बदलला
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट पुढच्या वर्षी ओटीटीवर रिलीज केला जाणार होता. पण चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करु शकला नाही, त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर लवकर रिलीज करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला.
Keep your p̶o̶p̶c̶o̶r̶n̶ golgappas ready because Laal Singh Chaddha is NOW STREAMING!😍🪶 pic.twitter.com/KTcDwiJAfA
— Netflix India (@NetflixIndia) October 5, 2022
आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिरसोबतच या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर, मोना सिंह आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: