(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? 31 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं नाव
आमिर (Aamir Khan) तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका 31 वर्षाच्या अभिनेत्रीसोबत आमिरचं नाव जोडलं जात आहे.
Aamir Khan: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर हा 58 वर्षांचा असून त्यानं आतापर्यंत दोन वेळा संसार थाटला आहे. आता आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका 31 वर्षाच्या अभिनेत्रीसोबत आमिरचं नाव जोडलं जात आहे. नुकताच आमिरचा या अभिनेत्रीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच केआरके (KRK) उर्फ कमाल आर खान यानं देखील आमिर आणि एका अभिनेत्रीबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आमिर खानचं नाव दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत (Fatima Sana Shaikh) जोडलं जात आहे. आमिर आणि फातिमाचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आमिर आणि फातिमा हे पिकलबॉल खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिर हा फातिमाला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.
View this post on Instagram
केआरकेचे ट्वीट
केआरकेनं फातिमा आणि आमिर यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, "आमिर खान आता त्याच्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लग्न करणार आहे. 'दंगल' या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं". केआरकेच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Breaking News:- Aamir Khan is going to get married with his daughter’s age Fatima Sana Shaikh soon. Aamir Khan is dating Sana from the time of their film #Dangal.
— KRK (@kamaalrkhan) May 25, 2023
आमिरनं दोन वेळा थाटला संसार
1986 मध्ये आमिरनं रीना दत्तासोबत लग्न केलं त्यानंतर 2002 मध्ये रीनासोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिरनं 2005 मध्ये किरण रावसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये आमिर आणि किरण हे विभक्त झाले. आता आमिरचं नाव फातिमा सना शेखसोबत जोडलं जात आहे. पण फातिमा आणि आमिर यांनी त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
संबंधित बातम्या
Aamir Khan-Kiran Rao Divorce : आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर 'दंगल गर्ल' फातिमा शेख ट्विटरवर ट्रेंड