Aamir Khan-Kiran Rao Divorce : आमीर-किरणच्या घटस्फोटानंतर 'दंगल गर्ल' फातिमा शेख ट्विटरवर ट्रेंड
दंगल सिनेमानंतर फातिमा आमिर खान सोबत पुन्हा 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' सिनेमात झळकली होती. त्यानंतर आमिर आणि फातिमाबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली होती. यामुळे किरण राव नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती.
मुंबई : बॉलिवूड स्टार आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांपासून वेगळं होत घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र आम्ही विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असं या दोघांनी म्हटलंय. तरीही या दोघांच्या फॅन्सना या दोघांच्या वेगळं होण्याचं नेमक कारण समजत नाहीये. वेगळवेगळे अंदाज आता याबद्दल बांधले जात आहेत. त्यातच 'दंगल गर्ल' फातिमी सना शेख ट्विटरवर चर्चेत आहे. आमिर आणि किरणच्या वेगळं झाल्यानंतर फातिमा का चर्चेत हे पाहुयात.
आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं कारण फातिमा शेख असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. आमिर आणि फातिमामधील जवळीत यामुळे आमिर आणि किरण यांचं 15 वर्षाचं नातं तुटल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर #FatimaSanaShaikh हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फातिमाने आमिर खानसोबत दंगल सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका केली होती.
दंगल सिनेमातील फातिमाच्या कामाचं कौतुक झालं होतं. सिनेमाही सुपरहिट ठरला होता. त्यानंतर फातिमा आमिर खान सोबत पुन्हा एकदा 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' सिनेमात झळकली होती. त्यानंतर आमिर आणि फातिमाबद्दल अनेक चर्चांना सुरुवात झाली होती. यामुळे किरण राव नाराज असल्याची देखील चर्चा होती.
या चर्चांवर फातिमाने स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, मी आमिर खान माझे गुरु आणि मार्गदर्शक आहेत. अशा चर्चांमुळे त्रास होतो. मात्र आमिर आणि किरण यांच्या वेगळं होण्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा फातिमा चर्चेत आली.
Congratulations in advance aamir and Fatima Sana Shaikh.
— Anshu Biswas (@AnshuBiswas3) July 3, 2021
Hope it will last a long time #AamirKhan pic.twitter.com/7KYRxiK8Bl
Aamir khan Next Target..
— Rajput 🔱SherShah (@S1Rajput2) July 3, 2021
#Fatima #KiranRaw #AamirKhan pic.twitter.com/qLBrbisd0t
Wtf 😂😐 Fatima started trending after the announcement of #Aamir
— ᴍᴀᴇꜱᴛʀᴏ ᴋʜɪʟᴀᴅɪ (@MaeStro_Khiladi) July 3, 2021
Khan and #KiranRao's divorce. pic.twitter.com/kieBvahWhR
#divorce#lovejihad#BoycottAamirKhan
— ⒶⒷⒽⒾⓂⒶⓃⓎⓊ (@_Abhimanyu____) July 3, 2021
आमिर खान
1st marriage Reena Dutta
2nd marriage किरण राव
Now , Next marriage of #AamirKhan
With Fatima Sana ❗❗❗❗
.@BeingSalmanKhan Reaction after seeing this
👇👇 pic.twitter.com/Dz3g1inzcJ
#AamirKhan #Fatima #FatimaSanaShaikh
— KME STUDIO (@kme_studio) July 3, 2021
Congratulations..!!! pic.twitter.com/qW1MfGQuyz