KKBKKJ Twitter Review: "भाईजानच्या एन्ट्रीला शिट्ट्या; थिएटर झालं स्टेडियम", कसा आहे ‘किसी का भाई किसी की जान’? नेटकरी म्हणतात...
'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
KKBKKJ Twitter Review: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. आज ही प्रतीक्षा संपली असून 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सलमान खानचा हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कशी रिअॅक्शन दिली? ते जाणून घेऊयात...
सलमानच्या एन्ट्रीला मिळली प्रेक्षकांची पसंती
एका नेटकऱ्यानं ट्विटरवर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील सलमानची एन्ट्री जबरदस्त आहे. त्याचा स्वॅग, मोठे केस, त्याची personalty, अॅक्शन या सर्व गोष्टींनी माझं मनं जिंकलं आहे. या चित्रपटाची ब्लॉकबस्टर सुरुवात झाली आहे.'
#KisiKaBhaiKisiKiJaan the Entry of #Salmankhan is literally
— 𝐊𝐀𝐁𝐈𝐑 ♛ (@ISalman_Rules) April 21, 2023
mind-blowing and amazing🔥#Salmankhan bgm with
the style and swag of bhi is damn good, action+ long hair and the dashing personalty of #Salmankhan is blow your mind ❤️
Starting blockbuster🔥
Entry + BGM + Pre interval + Interval + Climax Elephant scene 🔥🔥
— Sanaul Khan (@SanaulK28451996) April 21, 2023
Review ⭐⭐⭐⭐
Good job #SalmanKhan𓃵#kisiKaBhaiKisiKiJaan #SalmanKhan𓃵
तर दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सिटीमार एन्ट्री' तर एका युझरनं लिहिलं, 'सलमान खानची एन्ट्री झाल्यानंतर थिएटर हे स्टेडियम झाले आहे, असं वाटू लागलं.'
SALMAN KHAN ENTRY WHOLE THEATER TURN INTO STADIUM!!🔥🥹#KisiKaBhaiKisiKiJaanReview
— Being_Aarohi™ (@Beingaarohi8) April 21, 2023
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या