एक्स्प्लोर

Kiran Rao : 'लापता लेडीज'ची ऑस्कर झेप, किरण रावची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली....

Kiran Rao : किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या सिनेमाची अधिकृतरित्या ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे.

Kiran Rao : किरण राव (Kiran rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. किरण रावचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे आणि तिच्या पहिल्याच सिनेमाची दखल ऑस्करनेही घेतली आहे. दरम्यान या सिनेमाची कथा ही प्रत्येकालाच भावली. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या कथेचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही चांगल यश या सिनेमाने मिळवलं. 

दरम्यान यानंतर सिनेमाची दिग्दर्शिका किरण राव हिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने ऑस्कर टीमचे, तिच्या सर्व टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील साध्या घरातील स्त्रियांची ही गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष सिनेमाच्या गोष्टीने वेधून घेतलं. किरण रावने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 

किरण रावने काय म्हटलं?

किरण रावने तिच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'लापता लेडीज हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या गोष्टीचा खूप आनंद झालाय. ही माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाची घेतलेली दखल आहे. सिनेमा हे मनं जोडण्यासाठी, सीमा ओलांडण्यासाठी आणि अर्थपूर्ण संभाषणांसाठी कायमच एक प्रभावी माध्यम राहिलं आहे. मला आशा आहे की हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.'

'मी निवड समितीचेही मनापासून आभार मानते ज्यांनी या सिनेमावर विश्वास ठेवला आहे. यंदाच्या वर्षात सगळ्या चांगल्या सिनेमांमधून आमच्या सिनेमाची निवड होते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण यासाठी आम्ही सगळे पात्र आहोत. मी आमिर खान प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओज् यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास दाखवला.'       

'प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे. तुमचा हा विश्वासच आम्हाला नवनवीन गोष्टी करण्याचं बळ मिळतं. या अतुलनीय सन्मानासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही हे घेण्यास उत्सुक आहोत आणि मोठ्या उत्साहाने पुढचा प्रवास करणार आहोत...' 

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Rao (@raodyness)

ही बातमी वाचा : 

Laapataa Ladies Official Entry: किरण रावचा 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, फिल्म फेडरेशनकडून 29 चित्रपटांमधून निवड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter: पोलीस चालत जाऊन रुग्णालयातील स्ट्रेचरवर झोपले, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जितेंद्र आव्हाडांचा दावा
पोलीस चालत जाऊन रुग्णालयातील स्ट्रेचरवर झोपले, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जितेंद्र आव्हाडांचा दावा
Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Akshay Shinde Encounter : विरोधकांचे गंभीर आरोप; अक्षय शिंदे एन्काऊंटरची बदलापूर फाईलAditya Thackeray On Shinde Encounter : 'त्याला फाशीच व्हायला हवी होती, मात्र जे घडलं ते हलगर्जीपणा'Opposition On Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर विरोधकांचे संतप्त सवालAkshay Shinde's Mother Reaction : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या पालकांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter: पोलीस चालत जाऊन रुग्णालयातील स्ट्रेचरवर झोपले, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जितेंद्र आव्हाडांचा दावा
पोलीस चालत जाऊन रुग्णालयातील स्ट्रेचरवर झोपले, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जितेंद्र आव्हाडांचा दावा
Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Badlapur Case : इकडे अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू, बदलापूरच्या शाळेचे संस्थाचालक कोतवाल, आपटेंची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव
बदलापूरच्या शाळेच्या संस्थाचालकांची हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव, पुढील सुनावणी कधी?
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
Embed widget