Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : मोठमोठे झुंबर ते आलिशान बैठक व्यवस्था; थाटात पार पडणार कियारा-सिद्धार्थचा संगीत सोहळा
Kiara Advani Sidharth Malhotra : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा येत्या 7 फेब्रुवारी लग्नबंधनात अडकणार असून आज त्यांच्या संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीत सोहळा पार पडणार आहे.
सिद्धार्थ-कियाराचा संगीत सोहळा खूपच शाही असणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या संगीत सोहळ्याच्या तयारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोठमोठे झुंबर, पाहुण्यांची आलिशान बैठक व्यवस्था, मध्यभागी उभारण्यात आलेला स्टेज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार संगीतसोहळा
सिद्धार्थ-कियारा येत्या 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या पॅलेसमध्ये त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून आज संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. संगीतसाठी या पॅलेसमधील एका भागात खास मंडप उभारण्यात आला आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या डान्सकडे चाहत्यांचं लक्ष
सिद्धार्थ-कियाराच्या संगीतात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डान्स करणार आहेत. या संगीत कार्यक्रमाला कोण-कोण सेलिब्रिटी हजेरी लावणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण आता चाहत्यांना मात्र या संगीत सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून अवघ्या काही तासांत त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
बॉलिवूडमध्ये लगीनघाईला सुरुवात
बॉलिवूडमध्ये लगीनघाईला सुरू आहे. सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी नुकतीच क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ कियारा आणि सिद्धार्थदेखील लग्नगाठ बांधणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थचा लग्नसोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही.
सिद्धार्थ-कियाराचे आगमी प्रोजेक्ट
सिद्धार्थचा 'मिशन मजनू' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तो दिशा पाटनी आणि राशी खन्नासोबत झळकणार आहे. तर दुसरीकडे कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या