KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'ला मिळाली पहिली करोडपती स्पर्धक; प्रोमो आऊट
Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'ला पहिली करोडपती स्पर्धक अखेर मिळाली आहे.
Kaun Banega Crorepati 14 Promo : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अनेकांनी नशीब आजमावलं आहे. अनेक स्पर्धक लखपती झाले आहेत. सध्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे चौदावे पर्व सुरू असून अनेक स्पर्धकांनी लाखो रुपये जिंकले आहेत. पण करोडपती मात्र कोणीही झालं नव्हतं. पण 'कौन बनेगा करोडपती'च्या आगामी भागात प्रेक्षकांना पहिल्यांदाच एक महिला करोडपती झालेली पाहायला मिळणार आहे.
पहिली करोडपती स्पर्धक कोण आहे?
'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या पर्वाला अखेर करोडपती स्पर्धक मिळाली आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर नवा प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या पर्वाला मिळालेली पहिली स्पर्धक कोल्हापूरची एक गृहिणी आहे. कविता चावला असे या पहिल्या करोडपती स्पर्धकाचे नाव आहे.
View this post on Instagram
कविता चावला एक कोटी जिंकल्यानंतर आता ती 7.5 कोटी जिंकते का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या पर्वात काही बदल करण्यात आले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 'कौन बनेगा करोडपती'च्या बक्षीसाच्या रकमेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कविता चावला किती पैसै जिंकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
कौन होणार करोडपतीचे बदललेले नियम
काही दिवसांपासून कौन बनेगा करोडपतीचा 14वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता बक्षिसाची रक्कम 7 कोटींऐवजी 7.5 कोटी रुपये आहे. तसेच 50 लाखांनंतर 75 लाख रुपयांचा एक प्रश्न देखील देण्यात आला आहे. आता स्पर्धकांना 50 लाखांनंतर 75 लाख रुपये जिंकण्याचीही संधी आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत एकही स्पर्धक करोडपतींच्या यादीत सामील झालेला नाही.
संबंधित बातम्या