Kaun Banega Crorepati : जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन? केबीसीच्या मंचावर केला खुलासा
KBC 14 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत.
![Kaun Banega Crorepati : जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन? केबीसीच्या मंचावर केला खुलासा Kaun Banega Crorepati Is Amitabh Bachchan afraid of Jaya Bachchan Revealed on KBC forum Kaun Banega Crorepati : जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन? केबीसीच्या मंचावर केला खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/11/9160bcf14adc8f2cb561642ad2be1f181662909320053254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा कार्यक्रम अधिक रंजक होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. केबीसीच्या मंचावर अमिताभ त्यांच्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अमिताभ जया बच्चनला घाबरत असल्याचा खुलासा त्यांनी केबीसीच्या मंचावर केला आहे.
'कौन बनेगा करोडपती'चा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये स्पर्धक अमिताभ यांना प्रश्न विचारताना दिसतोय. स्पर्धक विचारतोय," जेव्हा मी हसत-खेळत घरी जातो... तेवढ्यात अमिताभ म्हणतात, तेव्हा बायको विचारते..कोणाला भेटलास? एवढा आनंदी का आहेस?... त्यानंतर स्पर्धक म्हणतो, तुम्हाला कसं माहित...यावर अमिताभ म्हणतात.. घरोघरी हेच होत असतं...आमच्या घरीदेखील होतं." त्यानंतर एकच हशा पिकतो.
View this post on Instagram
कौन होणार करोडपतीचे बदललेले नियम
काही दिवसांपासून कौन बनेगा करोडपतीचा 14वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता बक्षिसाची रक्कम 7 कोटींऐवजी 7.5 कोटी रुपये आहे. तसेच 50 लाखांनंतर 75 लाख रुपयांचा एक प्रश्न देखील देण्यात आला आहे. आता स्पर्धकांना 50 लाखांनंतर 75 लाख रुपये जिंकण्याचीही संधी आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत एकही स्पर्धक करोडपतींच्या यादीत सामील झालेला नाही.
संबंधित बातम्या
KBC : केबीसीच्या स्पर्धकांना मिळत नाही बक्षिसाची पूर्ण रक्कम; कापले जातात एवढे पैसे, जाणून घ्या...
KBC 14 : 'या' प्रश्नामुळे हुकली बंगळुरुच्या अनु वर्गीस यांची 'करोडपती' होण्याची संधी! तुम्हाला उत्तर माहितीये का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)