एक्स्प्लोर

KBC 14 : ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या मंचावर कॉमनवेल्थ गेम्स विजेत्यांचा सन्मान, साइखोम मीराबाई चानूंसह निखत झरीन खेळणार खेळ!

KBC 14 :  CWG मधील विजयाचा क्षण आणि त्यावेळी इतर सर्व देशांच्या वर आपला तिरंगा फडकताना पाहण्याचा रोमांचक अनुभव कसा होता, याविषयी त्या सांगणार आहेत.

KBC 14 : अलीकडे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022(Common Wealth Games 2022)  मधील भारताच्या कामगिरीचा गौरव करत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती 14’मध्ये (KBC 14) येत्या आठवड्यात या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणार्‍या साइखोम मीराबाई चानू (Saikhom Mirabai Chanu) (वेटलिफ्टिंग) आणि निखत झरीन (Nikhat Zareen) (बॉक्सिंग) यांचे हॉटसीटवर स्वागत करण्यात येणार आहे. होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर बसून या दोघी या खेळातही जेव्हा एक एक उत्तरे देत मोठ्या रकमेच्या जवळ पोहोचतील, तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढत जाईल.

या भागात दोघी एकमेकींशी देखील बर्‍याच गप्पा मारताना दिसतील आणि प्रेक्षकांना त्या आपले अनुभव सांगतील. CWG मधील विजयाचा क्षण आणि त्यावेळी इतर सर्व देशांच्या वर आपला तिरंगा फडकताना पाहण्याचा रोमांचक अनुभव कसा होता, याविषयी त्या सांगणार आहेत.

सुवर्ण पदक मिळवण्यासाठी पोडियमवर उभे राहिल्यावर कसे वाटले?

सुवर्ण पदक मिळवण्यासाठी पोडियमवर उभे राहिल्यावर कसे वाटले? या अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना निखत म्हणाली, ‘माझ्या डोळ्यात आनंदाश्रू साठले होते. माझ्या पाहिल्या-वहिल्या CWG सहभागातच सुवर्ण पदक मिळाल्याचा आनंद मला झाला होता. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर सगळ्यांच्या माझ्याकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्यामुळे, रिंगमध्ये जाऊन उत्कृष्ट परफॉर्म करून माझ्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याकडे माझे लक्ष होते. मी तेच केले आणि मला आनंद वाटतो की, मी माझ्या देशासाठी सुवर्ण पदक मिळवू शकले.

आपल्या देशाचा झेंडा सर्वात वर फडकत राहावा, अशी माझी मनापासून इच्छा!

मीराबाई चानूने देखील आपली भावना व्यक्त करत म्हटले की, ‘मला खूपच आनंद झाला होता, कारण टोकियो ऑलिंपिक्सनंतर संपूर्ण देशाने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. ते एक दडपण मनावर होते, कारण टोकियो ऑलिंपिक्सनंतर ही एक मोठी स्पर्धा होती. 2018च्या CWG मध्ये मी सुवर्ण पदक जिंकले होते, तसे यावेळीही ते मिळवण्यासाठी मी कटिबद्ध होते. आपल्या देशाचा झेंडा सर्वात वर फडकत राहावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मला आणखी आनंद कशामुळे झाला असेल, तर तो म्हणजे, स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरले होते आणि ते मला सपोर्ट करत होते. त्यावेळी मला हे जाणवले, की मी भारतासाठी पदक मिळवलेच पाहिजे. जेव्हा मला पदक मिळाले आणि आपला ध्वज सर्वांच्या वर फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा आम्ही सर्व जण अगदी खणखणीत आवाजात राष्ट्रगीत म्हणत होतो. माझ्यासाठी तो एक भावुक करणारा क्षण होता.’

देशातील लोकांनी आपल्यावर राज्य केले ते लोक आज आपल्या ध्वजाचा मान राखत होते….

ज्या देशाने भारतावर राज्य केले, त्या देशात भारताचा झेंडा इतक्या उंच फडकताना बघताना कसे वाटले याबद्दल बोलताना निखत म्हणाली, ‘तो अत्यंत संस्मरणीय असा क्षण होता, कारण ज्यावेळी मला पोडियमवर सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले, तेव्हा राष्ट्रगीत वाजत होते आणि जेव्हा आपला ध्वज फडकावण्यात आला, तेव्हा मी प्रेक्षकांकडे वळून बघितले होते, की ते सर्व उभे आहेत की नाही. पण भारतीयच नाही, तर परदेशी लोकांनाही जेव्हा मी उभे राहिलेले पाहिले, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला आणि मी ताठ मानेने आपले राष्ट्रगीत म्हटले. तो खरोखर एक भावुक क्षण होता. ज्या देशातील लोकांनी आपल्यावर राज्य केले ते लोक आज आपल्या ध्वजाचा मान राखत होते आणि आपले राष्ट्रगीत म्हणत होते ही एक भारतीय म्हणून माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती.’

जिंकलेली रक्कम करणार दान

 निखत झरीन या खेळत जिंकलेली रक्कम ‘हैदराबाद रनर्स सोसायटी’ला दान करणार आहे. या ना-नफा संस्थेचे उद्दीष्ट रनिंगला (धावणे) फिटनेससाठीची प्रमुख अॅक्टिव्हिटी करून एक सक्रिय जीवनशैली अंगिकारण्यासाठी लोकांना मदत करण्याचे आहे. मीराबाई चानू तिने जिंकलेली रक्कम NEWSला (नेटवर्क ऑफ इकॉनॉमी अँड वेल्फेअर सर्व्हिस) दान करणार आहे, जी संस्था अंध आणि मूकबधिर मुलांना त्यांची अभ्यासेतर कौशल्ये विकसित करण्यास प्रोत्साहन देते. ‘कौन बनेगा करोडपती 14’चा हा एपिसोड 5 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा :

Amitabh Bachchan : कोरोनावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केली 'कौन बनेगा करोडपती'च्या शूटिंगला सुरुवात; प्रोमो आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Embed widget