एक्स्प्लोर

Karan Johar : ‘बॉयकॉट’ ट्रेंडला घाबरला करण जोहर, ‘लायगर’ संदर्भात घेतला मोठा निर्णय!

Karan Johar : प्रेक्षक बॉलिवूड इंडस्ट्रीवर नाराज झाले आहेत. याच बॉयकॉटच्या नाऱ्याचा धसका आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही (Karan Johar) घेतला आहे.

Karan Johar : बॉलिवूडला सध्या उतरती कळा लागली आहे. एकामागोमाग एक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटत आहेत. सध्या सोशल मीडियावरही ‘बॉयकॉट’चा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक बॉलिवूड इंडस्ट्रीवर नाराज झाले आहेत. याच बॉयकॉटच्या नाऱ्याचा धसका आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही (Karan Johar) घेतला आहे. लवकरच करण जोहरचा बहुचर्चित ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, सध्या बॉलिवूड बॉक्स ऑफिसची परिस्थिती पाहता करण जोहर देखील चिंतेत पडला असून, त्याने एक मोठा निर्णय घेतल्याचे कळते आहे.

करण जोहर त्याचा आगामी ‘लायगर’ हा चित्रपट आधी साऊथ भाषेत दाक्षिणात्य भागांमध्ये रिलीज करणार असल्याचे म्हटले जात आहे. 'लायगर' 25 ऑगस्टला रिलीज होत आहे, ज्यासाठी संपूर्ण टीम मेहनत करत आहे. चित्रपटाचे मुख्य कलाकार अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा देशातील विविध शहरांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहर दक्षिण भारतात ‘लायगर’ पहिल्यांदा रिलीज करण्याच्या तयारीत आहे.

साऊथमध्ये मिळू शकतो चांगला प्रतिसाद

मीडिया रिपोर्ट नुसार, करण त्याचा ‘लायगर’ हा चित्रपट आधी साऊथमध्ये आणि त्यानंतर हिंदीत प्रदर्शित करणार आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर चांगला दबदबा दिसून येत आहे. याचाच फायदा या चित्रपटाला मिळू शकतो. याच गोष्टींचा विचार करून करण जोहरने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. चांगला रिव्ह्यू आणि कलेक्शनमुळे लोकांना या चित्रपटाकडे वळवता येऊ शकते.

विजय देवरकोंडा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमधील विजयच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले होता. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. ‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.

 ‘लायगर’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत

‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'अकडी पकडी' हे गाणं रिलीज झालं. ‘लायगर’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली.

हेही वाचा:

Liger Trailer Launch : विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर होणार लाँच; 'या' बॉलिवूड अभिनेत्याची विशेष उपस्थिती

Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Shinde Statement On Walmik Karad : वाल्मिक कराडचे 'कर्म'काडं उघड, अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंच्या जबाबात काय?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 11 March 2025 : 6 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Embed widget