Karan Johar: 'माझ्या बायोपिकमध्ये 'या' अभिनेत्यानं साकारावी प्रमुख भूमिका'; करण जोहरनं व्यक्त केली इच्छा
एका मुलाखतीमध्ये नुकताच करणला (Karan Johar) त्याच्या बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला करणननं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Karan Johar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. वयाच्या 26 व्या वर्षी त्यानं कुछ कुछ होता है या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. स्टारकिडचा गॉडफादर असंही अनेकवेळा करण जोहरला म्हटलं जातं. अनेक वेळा स्टारकिड्सला लाँच केल्यानं करणला ट्रोल देखील केलं जातं. एका मुलाखतीमध्ये नुकताच करणला त्याच्या बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला करणननं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाला करण जोहर?
एका मुलाखतीमध्ये करण जोहरला त्याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत करण जोहर म्हणाला, 'मला वाटते की रणवीर सिंह या भूमिकेसाठी योग्य असेल कारण तो अनेकदा रंग बदलतो. म्हणूनच रणवीर पडद्यावर माझी भूमिका साकारण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, त्याच्यापेक्षा चांगलं काम कोणी करु शकत नाही.' करणनं अजून त्याच्या बायोपिकबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
'कुछ कुछ होता है' 'माय नेम इज खान,' स्टूडेंट ऑफ द इयर,' 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानं अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणननं केले. तसेच त्यानं चित्रपटांची निर्मिती देखील केली.
करणचे आगामी चित्रपट
करण जोहरचे रॉकी और रानी आणि गोविंदा नाम मेरा हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर, विकी कौशल आणि कियारा आडवणी हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
करण जोहरच्या रॉकी और रानी या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: