Karan Johar : करण जोहरला सिनेसृष्टीत 25 वर्ष पूर्ण; ब्रिटिश पार्लमेंटकडून विशेष सन्मान
Karan Johar : बॉलिवूड सिनेदिग्दर्शक करण जोहरला सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण झाले असून त्याला आता ब्रिटिश संसदेकडून सन्मानित करण्यात आले आहे.
Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) गेल्या 25 वर्षांत अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. 'कुछ कुछ होता है' आणि 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. करण जौहरच्या सिनेमांची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता त्याला सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण झाली असून ब्रिटिश संसदेकडून (British Parliament) त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
करण जोहरला ब्रिटिश पार्लमेंटकडून विशेष सन्मान
करण जोहर बॉलिवूडचा एक लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक आहे. नुकतचं सिनेसृष्टीत त्याला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 जून 2023 हा दिवस करण जौहरसाठी खूपच खास होता. कारण सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्याला ब्रिटिश संसदेकडून सन्मानित करण्यात आले आहे.
करण जौहरचा फोटो व्हायरल...
करण जोहर गेल्या 25 वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम केलं आहे. करणने 'कभी खुशी कभी गम', 'ऐ दिल है मुश्किल', 'कुछ कुछ होता है', 'कभी अलविदा न कहना' सारखे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. करणने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याचा ब्रिटिश संसदेकडून सन्मान होताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
लंडनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये करण जौहरला सन्मानित करण्यात आले आहे. करणने त्याच्या अनेक सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये केलं आहे. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी' या सिनेमांचा यात समावेश आहे.
करण जोहरच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Karan Johar Upcoming Movies)
भारतीय सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणाऱ्या करण जौहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Or Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा त्याने सांभाळली असून यात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत. त्याचा हा सिनेमा भारतासह लंडनमध्येदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'कॉफी विद करण'च्या आगामी सीझनदेखील करण होस्ट करणार आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या