Dhadak 2 Movie : जातीवादाच्या आगीत जळणार आणखी प्रेम कहाणी! सिद्धार्थ-तृप्तीच्या 'धडक-2' च्या रिलीजची घोषणा
Dhadak 2 Movie : धडक-2 मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी हे लीड रोलमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत.
![Dhadak 2 Movie : जातीवादाच्या आगीत जळणार आणखी प्रेम कहाणी! सिद्धार्थ-तृप्तीच्या 'धडक-2' च्या रिलीजची घोषणा Karan Johar announces Dhadak 2 with Siddhant Chaturvedi and Triptii Dimri watch First Look here Dhadak 2 Movie : जातीवादाच्या आगीत जळणार आणखी प्रेम कहाणी! सिद्धार्थ-तृप्तीच्या 'धडक-2' च्या रिलीजची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/a21ceaff092be3003151d87f2209337c1716804008698290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhadak 2 Movie : चित्रपट निर्माता करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शनचा नवीन चित्रपट 'धडक-2' (Dhadak 2) ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातील फक्त अभिनेत्याची नव्हे तर रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे. धडक-2 मध्ये सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हे लीड रोलमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत. चित्रपटाच्या ग्राफिकल पोस्टरमध्ये चित्रपटाच्या कथानकाची झलकही दिसून येत आहे.
निर्माता करण जोहर याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची घोषणा केली. या व्हिडीओसोबत करण जोहरने, ही गोष्ट थोडी वेगळी आहे. एक होता राजा आणि एक होती राणी...त्यांची जात वेगळी होती...गोष्ट संपली. ('यह कहानी थोड़ी अलग है, क्योंकि एक राजा था और एक रानी थी, जाति अलग थी... कहानी खत्म।')
चित्रपटाच्या या व्हिडीओच्या अखेरीस , 'हो यारा दुनिया अलग है मेरी तुम्हारी, कैसे मिलेंगे आग और पानी।' असे गाण्याचे शब्द आहेत. 'धडक' चित्रपटातही जातीवादात अडकलेल्या प्रेमावर भाष्य करण्यात आले. आता पुन्हा एकदा 'धडक-2' च्या माध्यमातून करण जोहरचा हा चित्रपट जाती व्यवस्थेवर भाष्य करणार आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
कधी रिलीज होणार 'धडक-2'?
जी स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन आणि क्लाउड 9 पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मिती होत असलेला हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
'धडक' हा चित्रपट मराठीमधील सैराट या चित्रपटाचा रिमेक होता. 'सैराट'ने मराठी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडीत काढले होते. 'सैराट' मधील कलाकारांचा अभिनय, गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. 'धडक' या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले होते. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 41 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 110 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)