CRPF Soldier Opens Fire At Camp : CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
CRPF Soldier Opens Fire At Camp : आरोपी हवालदार संजय कुमारने आपल्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला, ज्यात एक कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार झाला. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली.

CRPF Soldier Opens Fire At Camp : हिंसेनं धुमसत असलेल्या मणिपूरमधील एका छावणीत एका CRPF जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. या घटनेत 3 जवान शहीद झाले तर 8 जखमी झाले. सर्वांना रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS), इंफाळमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. आरोपी हवालदार संजय कुमारने आपल्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला, ज्यात एक कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार झाला. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सैनिक सीआरपीएफच्या 120 व्या बटालियनचा सदस्य होता. सध्या या घटनेच्या कारणांचा शोध सुरू आहे. सीआरपीएफकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणामागील कारण स्पष्ट होईल. सीआरपीएफचे अधिकारी कॅम्पमध्ये पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सैनिकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी उपाययोजनांचाही विचार केला जाऊ शकतो.
#WATCH | "A Central Reserve Police Force (CRPF) jawan opened fire at a camp in Manipur, killing two fellow personnel and injuring eight others before taking his own life," Officials say.
— ANI (@ANI) February 13, 2025
Visuals from the hospital in Imphal where the injured CRPF jawans are admitted. pic.twitter.com/WkpJ4EWT9g
आसाम रायफल्सच्या जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला होता
मागील वर्षी देखील 23 जानेवारी 2024 रोजी आसाम रायफल्सच्या एका जवानाने मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील साजिक टम्पक येथे आपल्या सहा साथीदारांवर गोळीबार केला होता. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तेव्हा आसाम रायफल्सचे आयजी म्हणाले होते की, याचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी ते एकत्र काम करत होते.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू,
दरम्यान, केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर 4 दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. राज्यात 21 महिन्यांपासून (3 मे 2023) सुरू असलेल्या जातीय हिंसाचारामुळे 300 हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे बिरेन यांच्यावर राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. विरोधी पक्षही या मुद्द्यावर एनडीएला सतत प्रश्न विचारत होते.
राहुल म्हणाले, पंतप्रधानांनी तातडीने मणिपूरला जावे
एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, हिंसाचार आणि जीवित आणि मालमत्तेची हानी होऊनही पीएम मोदींनी एन बीरेन सिंग यांना या पदावर ठेवले. पण आता लोकांचा वाढता दबाव, सर्वोच्च न्यायालयाची चौकशी आणि काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव यामुळे एन बिरेन सिंह यांना राजीनामा द्यावा लागला. पोस्टमध्ये ते म्हणाले की, यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात शांतता प्रस्थापित करणे आणि मणिपूरच्या लोकांच्या जखमा भरून काढण्याचे काम करणे. पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला जावे, तेथील लोकांचे म्हणणे ऐकावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ते काय योजना आखत आहेत ते सांगावे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
